प्रियांका चोप्राच्या 'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 14:51 IST2017-04-26T07:38:06+5:302017-04-26T14:51:25+5:30

प्रियांका चोप्रा बेवॉच नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा  ट्रेलर प्रियांकाच्या फॅन्ससाठी एक पर्वणी ठरला आहे.  मागच्या ट्रेलरमध्ये ...

Priyanka Chopra's 'Beauchatch' trailer release | प्रियांका चोप्राच्या 'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज

प्रियांका चोप्राच्या 'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज

रियांका चोप्रा बेवॉच नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा  ट्रेलर प्रियांकाच्या फॅन्ससाठी एक पर्वणी ठरला आहे.  मागच्या ट्रेलरमध्ये प्रियांका आणि ड्वेन जॉन्सन  यांची लव्ह हेट रिलेशनशीप आपल्याला बघायला मिळाली होती. या ट्रेलमध्ये ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफरॉन आपल्याला वेगळ्या लूकमध्ये अंडर कव्हर एजेंटच्या भूमिकेत दिसतील. या ट्रेलरमध्ये हंडसम हंक जॅक एफरॉन आपल्याला या ट्रेलमध्ये स्त्रीच्या वेशातही दिसणार आहे. 

या चित्रपटात ग्रे शेडमध्ये दिसणारी प्रियांका सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. बेवॉच प्रमोशनसाठी प्रियांका अमेरिकेतील टीव्ही शोमध्ये हजेरी लावताना दिसते. ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफरॉनसोबतचा प्रियांकाचा हा चित्रपटात 25 मे ला प्रदर्शित होणार आहे.   

या चित्रपटात प्रियांका आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सेठ गोडीन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेल्या ‘बेवॉच’ टीव्ही सिरीजवर आधारित आहे. 

Web Title: Priyanka Chopra's 'Beauchatch' trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.