प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला आहे हा गंभीर आजार, रात्रभर देसीगर्ल रहावे लागते जागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 08:00 IST2020-06-12T08:00:00+5:302020-06-12T08:00:00+5:30
निक जोनासमुळे प्रियंका रात्रीची झोपू शकत नाही.

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला आहे हा गंभीर आजार, रात्रभर देसीगर्ल रहावे लागते जागे
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका आणि पती निक जोनास याच्यातले बॉन्डिग कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे नेहमी एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात. प्रियंका सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत सगळ्या अपडेट शेअर करत असते. प्रियंका सध्या पती सोबत न्यूयॉर्कमध्ये आहे,. सध्या प्रियंकाच काही महिन्यांपूर्वी दिलेली एका मुलाखत व्हायरल होते आहे ज्यात तिने निकशी संबंधीत अनेक खुलासे केले होते.
एका प्रश्नाचे उत्तर देताना प्रियंका म्हणाली की तिचा नवरा निक जोनासमुळे ती रात्रीची झोपू शकत नाही. प्रियंकाने याच्या मागचे कारण देखील सांगितले होते, ती म्हणाली ''निकला डायबिटीज पेशन्ट आहे.प्रियांका म्हणते की, आधी मला काहीही समजले नाही.निक त्याच्या आजाराबद्दल खूप संवेदनशील आहे. झोपेतही त्याला शुगर लेव्हल माहित असते. प्रियंका म्हणाली या कारणामुळे मी रात्रभर झोपत नाही की अनेकवेळा मी रात्री उठून बघते की तो ठीक आहे की नाही. निकला लहान वयातच डायबिटीज झाला. डायबिटीज हा एक गंभीर आजार आहे, म्हणून निक त्याच्या आयुष्यात खूप शिस्तबद्ध असतो. प्रियंका म्हणते की निक या आजाराला घेऊन कधीही घाबरून जात नाही.''
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती द स्काय इज पिंक चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत झायरा वसीम व फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होते.हा चित्रपट समीक्षकांना खूप भावला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.