प्रियांका चोप्रा पाहत होती सिनेमा, निक जोनासला सुचली मस्ती, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:58 IST2018-12-11T15:44:27+5:302018-12-11T15:58:01+5:30
उदयपूरमध्ये इशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या प्री-वेडिंगचे सेलिब्रेशन केल्यानंतर सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एका रिसॉर्टमध्ये आहे.

प्रियांका चोप्रा पाहत होती सिनेमा, निक जोनासला सुचली मस्ती, व्हिडीओ व्हायरल
उदयपूरमध्ये इशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या प्री-वेडिंगचे सेलिब्रेशन केल्यानंतर सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एका रिसॉर्टमध्ये आहे. निक जोनासने इन्स्टाग्रामवर प्रियांकाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका पहिल्यांदा एल्फ सिनेमा (EIF) बघताना खूप फॅनी रिअॅक्शन देताना दिसतेय. या व्हिडीओत ती हसाताना, गाताना आणि मजा करताना दिसतेय आणि निक खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. निकने या व्हिडीओला एक कॅप्शन दिले आहे.
गत १ डिसेंबरला प्रियांका व निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुस-या दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांका व निकच्या लग्नाचा एकही फोटो लीक झाला नाही.
कारण या लग्नाच्या फोटोचे हक्क एका मॅगझिनला विकण्यात आले होते. तिचे म्हणाली की, सध्या मी काहीही प्लान केला नाही.
कारण मी माझ्या वर्क कमिटमेंट पूर्ण करण्यात लागली आहे. पण, माझा नवरा निकने स्पेशल प्लान बनवला आहे आणि माझ्यासाठी ते मोठे सरप्राईज असणार आहे. भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.