प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 01:36 PM2021-08-28T13:36:52+5:302021-08-28T13:37:21+5:30

सध्या प्रियंका चोप्रा आगामी सिनेमा सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली आहे.

Priyanka Chopra was injured during the shooting and fans were shocked to see her condition | प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

googlenewsNext

अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाचे जगभरात खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. सध्या ती आगामी सिनेमा सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियंकाला दुखापत झाली आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते खूप हैराण झाले आहेत.

प्रियंका चोप्राने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या कपाळावर जखमा पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर तिचे कपाळ रक्ताने माखलेले दिसत आहे. पहिला फोटो शेअर करत तिने कोणते खरे आणि कोणते खोटे असे कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचे सांगितले आहे. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचे म्हटले आहे.


प्रियांका चोप्रा या वर्षाच्या सुरुवातीपासून लंडनमध्ये सिटाडेल या चित्रपटाचे शूटिंग करते आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रो मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाआधी प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती मॅट्रिक्स ४मध्येही दिसणार आहे. या हॉलिवूडपटांशिवाय ती जी ले जरा या हिंदी चित्रपटात आलिया भट व कतरिना कैफसोबत झळकणार आहे.

Web Title: Priyanka Chopra was injured during the shooting and fans were shocked to see her condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.