सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २ सिनेमातून झाली होती प्रियंका चोप्राची हकालपट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:06 IST2021-02-17T13:58:26+5:302021-02-17T14:06:19+5:30
Why Priyanka Chopra was dropped from 2 films ? : देसीगर्ल प्रियंका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन झाली आहे.

सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २ सिनेमातून झाली होती प्रियंका चोप्राची हकालपट्टी!
अभिनेत्री प्रियंका चोप्रा ग्लोबल आयकॉन आहे. निक जोनासशी लग्नानंतर प्रियांका केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चेत कायम आहे. 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्रात प्रियंकाने तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले आहेत. 2000 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकल्यानंतर तिने 4 चित्रपट साईन केले होते. परंतु चेहऱ्याच्या चुकीच्या सर्जरीमुळे तिला दोन सिनेमातून काढून टाकण्यात आले. या दोन सिनेमांपैकी एक सिनेमा रिजनल होता.
प्रियंकाचा तमिळ सुपरस्टार विजयसोबत 2002मध्ये आलेला 'थमिजान' हा पहिला सिनेमा होता. प्रियंकाने या चित्रपटाविषयी सांगितले की, सर्जरीमुळे लूक्स खराब झाल्यावरही या सिनेमाच्या टीमने तिला सपोर्ट केले ज्यामुळे तिचा आत्मविश्वास परत आला. सेटवर प्रियांकाच्या लूकबद्दल कोणतीच चर्चा झाली नाही. प्रियंकासाठी तामिळ ही नवीन भाषा होती पण तमिळ प्रशिक्षकाने तिला खूप मदत केली.
प्रियांकाने तिची को-स्टारबद्दलही बर्याच गोष्टी लिहिल्या आहेत, जे त्यावेळी सुपरस्टार होते. प्रियंकाने लिहिते, की तिला आठवते विजयचे चाहते चित्रपटाच्या सेटवर कसे जमा व्हायचे आणि सतत 15 तास काम केल्यानंतरही तो चाहत्यांना कसा भेटायचा. प्रियंका म्हणाली, की जेव्हा ती न्यूयॉर्कमध्ये तिच्या ‘क्वांटिको’ या मालिकेचे शूटिंग करत होती, तेव्हा तिच्या चाहत्यांचा जमाव अशाच प्रकारे जमा झाला होता, तेव्हा तिला तिचा पहिला सहकारी अभिनेता विजय आठवला.