डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:34 IST2025-01-22T10:12:34+5:302025-01-22T10:34:17+5:30
प्रियांका कामानिमित्त भारतात आली आहे. नुकतंच तिने बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

डोक्यावर ओढणी अन् कपाळावर टिळा! पारंपरिक वेशात प्रियांका चोप्रा पोहोचली मंदिरात, बालाजीचं घेतलं दर्शन
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियांका कामानिमित्त भारतात आली आहे. नुकतंच तिने बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्रियांकाने हैदराबादमधील चिलकूर येथील श्री बालाजी मंदिराला भेट दिली. यावेळी प्रियांका पारंपरिक पेहरावात दिसून आली. तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिळा असा नो मेकअप लूक करत प्रियांका बालाजी मंदिरात पोहोचली. श्री बालाजीच्या चरणी नतमस्तक होत तिने दर्शन घेतलं. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. "श्री बालाजी यांच्या आशीर्वादाने नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. ॐ नमो नारायणाय", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
दरम्यान, प्रियांका एस एस राजामौली यांच्या साऊथ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती सध्या हैदराबादमध्ये आली आहे. तिने Thamizhan सिनेमातून २००२ साली तमिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाई'मधून ती बॉलिवूडमध्ये आली. बॉलिवूडला सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर प्रियांकाने 'क्वांटिको', 'बेवॉच', 'सिटाडेल', 'लव्ह अगेन', 'द बफ' या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.