बॉलिवू़डच्या या अभिनेत्रीला वयाच्या 12 व्या वर्षी व्हायचं होते आई, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 11:53 IST2019-10-12T11:47:38+5:302019-10-12T11:53:16+5:30
तिला वयाच्या 12 व्या वर्षी आई व्हायचे होते.

बॉलिवू़डच्या या अभिनेत्रीला वयाच्या 12 व्या वर्षी व्हायचं होते आई, स्वत: केला खुलासा
प्रियंका चोप्राने द स्काय इज पिंक सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे. या सिनेमातील प्रियंकाने साकारलेल्या आदितीच्या भूमिकेचे सगळीकडे कौतूक होते आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्रियंकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियंका म्हणाली, लवकरच तिला कुटुंब मोठं करायचं आहे. तिला वयाच्या 12 व्या वर्षीपासूनच आई व्हायचे होते. लहान मुलं प्रियंकाला खूप आवडतात.
द स्काय इज पिंक सिनेमा बघितल्यानंतर निक खूपच भावूक झाल्याचे प्रियंकाने सांगितले होते ती म्हणाली, निकला मी या चित्रपट दाखवला त्यावेळी आम्ही इटलीत होतो. आम्ही सुट्टीवर असताना मी त्याला चित्रपट दाखवला होता. निकला हिंदी येत नाही. पण त्याने सबटाइटल्स वाचत हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट पाहून तो खूपच भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते.
हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने लगेचच या चित्रपटाची दिग्दर्शक शोनाली बोसला फोन केला आणि या चित्रपटाने त्याच्या मनाला स्पर्श केला असे सांगितले. त्याने म्हटले की, खूप छान चित्रपट तू बनवला आहेस. खूप छान कथा आहे. माझ्या डोळ्यात चित्रपट पाहाताना पाणी आले. मी कधी माझ्या भावना कोणालाही दाखवत नाही.