'एका अज्ञात व्यक्तीने मालतीचा पाठलाग केला अन्...'; प्रियंका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:25 IST2026-03-11T13:25:26+5:302026-03-11T13:25:59+5:30
मी चाहत्यांंचं प्रेम समजू शकते पण..., काय म्हणाली प्रियंका चोप्रा?

'एका अज्ञात व्यक्तीने मालतीचा पाठलाग केला अन्...'; प्रियंका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. २०२२ साली तिला मुलगी झाली. मालती मेरी असं तिचं नाव ठेवण्यात आलं. मालती आज ४ वर्षांची असून तिचे क्युट फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रियंकाही मालतीचे काही गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र नुकतंच प्रियंकाने लेकीबाबतचा एक धक्कादायक किस्सा सांगितला. काय म्हणाली प्रियंका?
'नॉट स्किनी बट नॉट फॅट' पॉडकास्टमध्ये प्रियंका चोप्राने हजेरी लावली. जशी जशी मालती मोठी होत आहे, तसे तिला अधिक जपण्याचा आणि लोकांपासून लांब ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मालतीला कोणत्याही भीतीशिवाय सामान्य मुलांसारखे जीवन जगता यावे अशी प्रियंकाची इच्छा आहे. तिच्या परवानगीशिवाय कोणीही मालतीचे फोटो किंवा व्हिडिओ काढलेले तिला आवडत नाहीत.
या मुलाखतीदरम्यान प्रियांकाने एका भयावह घटनेचा उल्लेख केला. ती म्हणाली की, "एकदा एक अनोळखी व्यक्ती मालती शाळेतून घरी परतत असताना तिचा पाठलाग करत होती आणि तिचा व्हिडिओ बनवत होती. या घटनेमुळे प्रियांका आणि निक अत्यंत सावध झाले आहेत. याच कारणामुळे मालती जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा तिच्यासोबत सुरक्षा रक्षक तैनात असतात. प्रियांकाचे असे स्पष्ट मत आहे की, तिने स्वतःसाठी ग्लॅमरचे जग आणि सार्वजनिक जीवन निवडले आहे, परंतु तिच्या मुलीला तिचे आयुष्य कसे जगायचे याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मिळायला हवा. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम आम्हाला मान्य आहे, पण सुरक्षितता हीच आमची पहिली प्राथमिकता आहे."