दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 16:24 IST2020-05-12T16:03:47+5:302020-05-12T16:24:52+5:30
प्रियंकाने तिचा मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे.

दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली....
कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सगळ्या सेलिब्रेटी शूटिंग होत नसल्यामुळे घरातच थांबले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ते फॅन्सच्या संपर्कात आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह झाली आहे. पती निक जोनससोबत सध्या ती लॉस एंजिलिसमध्ये घरात क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
प्रियंकाने तिचा मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत प्रियंकाने कॅप्शन दिले आहे. ''डोळे कधीच शांत नसतात.'' दोन महिन्यांनतर प्रियंका घरातून बाहेर पडली आहे. मात्र प्रियंकाने तिच्या घराबाहेर पडण्याचे कारण मात्र सांगितलेले नाही. पण ती अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडली असेल असा अंदाज लावण्यात येतो आहे.
देसी गर्ल प्रियंका चोप्रा लग्न झाल्यानंतर आपल्या संसारात आनंदी आहे. अमेरिकन सिंगर निक जोनास आणि प्रियंका दोघेही वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये प्रियंका व निकचा टुमदार बंगला आहे. या घराची किंमत साधारण १४४कोटी रुपये इतकी असल्याचे कळते. शेवटची प्रियंका शेवटची प्रियंका द स्काय इज पिंक सिनेमात दिसली होती.