लेक मालतीला कडेवर घेऊन फिरताना दिसली प्रियंका, नेटकरी म्हणाले- ही तर निक जोनासची कार्बन कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:53 IST2023-12-01T10:51:51+5:302023-12-01T10:53:40+5:30
मालतीने तिच्या क्युट स्माईलने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

लेक मालतीला कडेवर घेऊन फिरताना दिसली प्रियंका, नेटकरी म्हणाले- ही तर निक जोनासची कार्बन कॉपी
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काम आणि कुटुंब यांच्यात प्रियंका चांगला समतोल साधते. आई झाल्यानंतर प्रियंका आपलं पहिलं प्राधान्य मालतीला देते. तिच्या संगोपनात कोणतीही कमतरता जाणून देत नाही. कामातून ब्रेक मिळाला की ती तो वेळ मालतीसोबत घालवताना दिसते. अलिकडेच देसीगर्ल मालतीला कडेवर घेऊन फिरताना दिसली. यादरम्यानचे मायलेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेटकरी मालती मेरीच्या क्युटनेसवर फिदा झालेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये प्रियंका तिच्या मुलीला कडेवर घेऊन कॅज्युअल लूकमध्ये फिरताना दिसत आहे. प्रियंकाने ज्या देसी स्टाईलमध्ये तिची मुलगी मालतीला आपल्या मांडीवर घेतले आहे त्यावरून ती आपल्या मुलीची खूप काळजी घेते हे स्पष्टपणे दिसून येते. एक-दोन फोटोंमध्ये प्रियंका मालतीला पाणी पाजताना दिसत आहे. या फोटोंमध्ये पीसीची मुलगी खूप गोड आणि गोंडस दिसत आहे. मालतीने तिच्या क्युट स्माईलने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले, पीसीची मुलगी हुबेहुब निक जोनाससारखी दिसते. दुसऱ्या नेटकऱ्याने यासोबतच यूजरने पीसीचा लहानपणीचा फोटोही कमेंटमध्ये शेअर केला आहे. बरेच लोक मालतीच्या क्यूटनेसवर कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले आहे - क्यूट मालती चोप्रा जोनास.