प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:37 IST2022-08-04T16:30:11+5:302022-08-04T16:37:49+5:30

प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump | प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

देसी गर्ल प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोफीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, हे पाहून अनेक लोक सोफीचे अभिनंदन करत आहेत, तर काहींना ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे.

सोफीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिचा बेबी बम्ब फ्लॉंट करताना दिसत आहे. तिने काळ्या क्रॉप टॉप आणि लेगिंगसह राखाडी-नारिंगी रंगाचे जाकीट घातले आहे. सूफी डोळे मिटून प्रेमाने हसताना दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले, 'फुल्ल ऑफ बेबी.' या फोटोमध्ये सोफी खूपच सुंदर दिसत आहे.

काही यूजर्सना सोफी तिसऱ्यांदा प्रेग्नंट नसल्याचे वाटत आहे. एका युजरने कमेंट केली, 'मी तुझ्यासाठी खुश आहे सॉफी',  दुसर्‍याने कमेंट करून विचारले की हा नवीन फोटो आहे की जुना. सोफीचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे. सोफीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीचा हा अनसीनचा  फोटो आहे, जो तिने आज शेअर केला आहे.

 

सोफी टर्नर आणि जो जोनास यांचं लग्न 29 जून 2019 रोजी झालं. दोघांना विला नावाची दोन वर्षांची मुलगी आहे आणि आता ते जुलैमध्ये दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. सोफी एक सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे आणि ती 'द गेम ऑफ थ्रोन्स' साठी ओळखली जाते आणि ती एक गायिका देखील आहे.
 

Web Title: Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump