प्रियंका चोप्राने साईन केला बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 21:00 IST2019-03-16T21:00:00+5:302019-03-16T21:00:00+5:30

लग्नानंतर प्रियंका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूड आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे.

Priyanka chopra signs one more bollywood movie | प्रियंका चोप्राने साईन केला बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा!

प्रियंका चोप्राने साईन केला बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा!

ठळक मुद्देप्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे

लग्नानंतर प्रियंका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूड आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे. काही दिवसांपूर्वीच  जोनास ब्रदर्सचा म्युझिक व्हिडीओ ‘सकर’ रिलीज झाला. जोनास ब्रदर्सच्या या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडीओमध्ये प्रियंका पती निक जोनाससोबत दिसली. त्यामुळे प्रियंकाच्या फॅन्सना भीती होती लग्नानंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये काम करेल की नाही, मात्र त्यांच्यासाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे.


 मीडिया रिपोर्टनुसार प्रियंकाने आणखी एक नवा सिनेमा साईन केला आहे. लवकरच ती या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. मात्र या सिनेमाबाबत अधिक काही माहिती अजून मिळालेली नाही.  


'द स्काय इज पिंक' या चित्रपटात प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते.या चित्रपटात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये झाले आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Priyanka chopra signs one more bollywood movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.