प्रियंका चोप्राची 'देसी गर्ल'! मालतीने काढलेली रांगोळी पाहून अभिनेत्रीही झाली थक्क, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 18:03 IST2023-11-12T18:01:14+5:302023-11-12T18:03:20+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही दिवाळीची जोरदार तयारी केली.

Priyanka Chopra shows off daughter Malti's 'first rangoli' | प्रियंका चोप्राची 'देसी गर्ल'! मालतीने काढलेली रांगोळी पाहून अभिनेत्रीही झाली थक्क, म्हणाली...

प्रियंका चोप्राची 'देसी गर्ल'! मालतीने काढलेली रांगोळी पाहून अभिनेत्रीही झाली थक्क, म्हणाली...

देशभरात दिवाळीची धामधुम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी देखील दिवाळी साजरी करत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही दिवाळीची जोरदार तयारी केली. यावेळी लहान मालतीने सुंदर रांगोळी काढली. त्याची झलक प्रियांकाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 

प्रियांका चोप्राने दिवाळीनिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासने काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी रंगाच्या फुलांची ही रांगोळी काढण्यात आली. मुलगी मालतीचे हे टॅलेंट पाहून प्रियांकालाही आश्चर्य वाटले. तिने इन्स्टा स्टोरीवर रांगोळी शेअर करत लिहिले, 'पहिली रांगोळी'. 

 निक आणि प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रितीरिवाजांनी विवाह केला होता. तर मालतीचा जन्म जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे झाला. प्रियांका लग्न करून परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अजूनही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेली आहे. प्रियांका तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी प्रत्येक हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरा करते.

अलिकडेच प्रियांकाची सिटाडेल ही हॉलिवूड वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता लवकरच ती  ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. याशिवाय ती 'केजीएफ' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या सिनेमात ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप मेकर्सकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. 

Web Title: Priyanka Chopra shows off daughter Malti's 'first rangoli'