निक जोनससोबतच्या वयाच्या अंतराबाबत बोलली प्रियंका चोप्रा, म्हणाली- निक आणि माझ्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 19:30 IST2021-01-11T19:30:00+5:302021-01-11T19:30:02+5:30
इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रा निक जोनासशी लग्न केल्यापासून चर्चेत आहे.

निक जोनससोबतच्या वयाच्या अंतराबाबत बोलली प्रियंका चोप्रा, म्हणाली- निक आणि माझ्यात...
इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रानिक जोनासशी लग्न केल्यापासून चर्चेत आहे. जेव्हा प्रियंका आणि निकचे लग्न झाले होते तेव्हा या दोघांमधील वयाच्या अंतरांबद्दल बरीच चर्चा झाली. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. प्रियांकाने आता या विषयावर उघडपणे भाष्य केले आहे.
प्रेमामध्ये कधीच संस्कृती आली नाही
प्रियांकाने एका विदेशी मॅगझीनशी बोलताना म्हटले की, तिच्या आणि निकच्या प्रेमामध्ये सांस्कृती कधीच आली नाही. निक देखील दुसऱ्या कपलप्रमाणे असा विश्वास ठेवत होता आणि त्यांना एकमेकांच्या सवयी समजून घ्याव्या लागतील. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यातील वयाचे अंतर नेहमीच चर्चा विषय असतो. याबद्दल प्रियंका म्हणाली की, तिच्या आणि निकच्या प्रेमामध्ये कधीच वयाचे अंतर नाही. प्रियंकाने मुलाखतीत आधीच सांगितले आहे की पहिल्या भेटीत ती आणि निकला एकमेकांना आवडले होते.
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यात प्रियंका, राजकुमार रावए आदर्श गौरव एकत्र दिसणार आहेत. ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.