प्रियांका चोप्रा म्हणाली, माझी रणवीर सिंगसोबतची जोडी लोकांना आवडते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 10:22 IST2017-01-11T21:05:32+5:302017-01-12T10:22:55+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. इंग्लिश व हिंदी ...

Priyanka Chopra said, "I like people paired with Ranveer Singh | प्रियांका चोप्रा म्हणाली, माझी रणवीर सिंगसोबतची जोडी लोकांना आवडते

प्रियांका चोप्रा म्हणाली, माझी रणवीर सिंगसोबतची जोडी लोकांना आवडते

लिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. इंग्लिश व हिंदी या दोन्ही भाषेत असलेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांका केवळ काही सेंकद दिसत असली तरी ती लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. अशातच प्रियाका चोप्राने, रणवीर सिंगसोबत माझी जोडी चाहत्यांना आवडत असल्याचे सांगून सुखद धक्का दिला आहे. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी चित्रपटांच्या शोधात आहे असे सांगण्यात येते. यासाठी तिला मोठे बॅनर, आजच्या काळातील आघाडीचा हिरो देखील हवा आहे. अशातच तिने चाहत्यांना माझी व रणवीर सिंगची जोडी आवडते असे सांगून आगामी चित्रपटात आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो असेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्राने रणवीर कपूरसोबत तीन चित्रपट केले असून तिनही चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत हे विशेष. 

प्रियाका म्हणाली, आम्ही दोघे आतापर्यंत लोकांना वेळवेगळ्या भूमिका करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मला वाटते लोकांना आमची जोडी व एकत्र एका चित्रपटात येणे आवडते. प्रियांका चोप्राने ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीरच्या प्रियसीची व पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत होती. तर झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात तिने रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात प्रियांकाने रणवीरच्या पत्नीची भूमिका केली होती. या शिवाय दोघांनी एकत्रपणे अनेकदा सोशल मीडियाहून आपले फोटो शेअर केले आहेत. मागील वर्षी एका टीव्ही कार्यक्रमात दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. 

प्रियांका चोप्राचा आगामी बेवॉच हा हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रियांका आपल्या बॉलिवूड पुनरागमनासाठी संधी शोधत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हृतिक रोशनच्या काबिल या चित्रपटात तिने डान्स नंबर करण्यास नकार दिला होता. 

priyanka chopra talks about her chemistry with ranveer singh

Web Title: Priyanka Chopra said, "I like people paired with Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.