सलमान-अक्षयला मागे टाकत प्रियंका चोप्राने मारली बाजी, याबाबतीत ठरली नंबर 1

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 11:34 IST2020-12-25T11:33:50+5:302020-12-25T11:34:48+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्राचे स्टारडम अद्यापही कायम आहे.

Priyanka Chopra, not Khan trio and Akshay Kumar, has the highest brand valu | सलमान-अक्षयला मागे टाकत प्रियंका चोप्राने मारली बाजी, याबाबतीत ठरली नंबर 1

सलमान-अक्षयला मागे टाकत प्रियंका चोप्राने मारली बाजी, याबाबतीत ठरली नंबर 1

ठळक मुद्देसर्व स्टार्सच्या ट्विटर, युट्यूब, गुगल सर्चच्या विश्लेषणानंतर सर्वात ट्रेंडिंग स्टार्सच्या यादीत अभिनेत्री क्रिती सॅनन हिने बाजी मारली आहे.

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्राचे स्टारडम अद्यापही कायम आहे. असे नसते तर ब्रँड व्हॅल्यूच्या शर्यतीत प्रियंकाने बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सला मागे टाकले नसते. होय,ब्रँड व्हॅल्यूच्याबाबतीत प्रियंकाने अक्षय कुमार, दबंग सलमान खान, आमीर खान या सगळ्यांनाच मागे टाकले आहे.

 

ऑनलाईन सेंटीमेंट अ‍ॅनालिसिस कंपनी चेकब्रँडने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  यासाठी या कंपनीने ऑगस्ट ते ऑक्टोबर 2020 या तीन महिन्यातील 26 भारतीय फिल्म स्टार्सचे सोशल मीडिया प्रजेंस व डिजिटल एंगेजमेंटचा अभ्यास केला.  फिल्मी स्टार्सची ब्रँड व्हॅल्यू ठरवणा-या या कंपनीच्या अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर या तिमाहीत प्रियंकाची ब्रँड व्हॅल्यू  सर्वाधिक 2.65 अब्ज रुपये होती. या यादीत दुस-या क्रमांकावर आहे तो अक्षय कुमार.

 अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यू आहे 2.60 अब्ज रुपये आहे.  सलमान खानचे म्हणाल तर त्याची ब्रँड व्हॅल्यू 2.52 अब्ज आहे. तो तिस-या क्रमांकावर आहे. या यादीत दीपिका पादुकोण चौथ्या स्थानावर आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू 2.11 अब्ज एवढी असल्याचे म्हटले आहे. पाचव्या क्रमांकावर अर्थातच किंग खान शाहरुख आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू  2.09 अब्ज रुपये आहे.

सोशल मीडिया एंगेजमेंटमध्ये सलमान नंबर 1

सोशल मीडिया एंगेजमेंटच्या बाबतीत भाईजान सलमान खान आघाडीवर आहे.  सलमान खानची एंगेजमेंट 2.25 लाख आहे. शाहरुखची 2.16 लाख,अक्षय कुमारची 1.7 लाख,अजय देवगणची   0.64 लाख आणि अमिताभ बच्चन यांचाचा स्कोअर 0.62 लाख इतका राहिला.

सर्वाधिक ट्रेंडिंग स्टार्स

सर्व स्टार्सच्या ट्विटर, युट्यूब, गुगल सर्चच्या विश्लेषणानंतर सर्वात ट्रेंडिंग स्टार्सच्या यादीत अभिनेत्री क्रिती सॅनन हिने बाजी मारली आहे.  मागच्या तीन महिन्यात क्रिती सेनन सर्वाधिक ट्रेंडमध्ये होती. दुस-या क्रमांकावर प्रियंका चोप्रा आणि तिस-या क्रमांकावर आलिया भट होती. यानंतर अनुक्रमे अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान ट्रेंडमध्ये राहिले.

  

Web Title: Priyanka Chopra, not Khan trio and Akshay Kumar, has the highest brand valu