प्रियांका चोप्राच्या रिसेप्शनमध्ये यांनी घेतली ‘शॉकिंग एन्ट्री’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:31 IST2018-12-21T13:29:46+5:302018-12-21T13:31:13+5:30
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली.

प्रियांका चोप्राच्या रिसेप्शनमध्ये यांनी घेतली ‘शॉकिंग एन्ट्री’!!
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. मुंबईत रंगलेल्या या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या तमाम सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, काजोल, जान्हवी कपूर असे सगळे या पार्टीत दिसले. केवळ इतकेच नाही तर काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली.
होय, ‘शॉकिंग एन्ट्री’ घेणारे हे स्टार होते, सलमान खान, शाहिद कपूर आणि हर्मन बावेजा.
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ प्रियांका व निकच्या रिसेप्शनला येतो की नाही, याबद्दल शंका होती. कारण होते, प्रियांकावरची सलमानची नाराजी. होय, प्रियांकाने लग्नापूर्वी सलमान खानचा ‘भारत’ साईन केला होता. पण शूटींग सुरु होणार, अशावेळी प्रियांकाने ऐनवेळी या चित्रपटातून अंग काढून घेतले. तिचा हा नकार सगळ्यांसाठीच ‘शॉकिंग’ होता. भाईजान तर यामुळे चांगलाच खवळला होता. त्याने अप्रत्यक्षपणे याबद्दलची नाराजीही बोलून दाखवली होती. भाईजान सहजी कुणाला माफ करत नाही. त्यामुळे प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये तो येईल, याची खात्री नव्हती. पण सलमान आला आणि त्याची एन्ट्री ‘शॉकिंग एन्ट्री’ ठरली.
प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेन्ड हर्मन बावेजा हाही प्रियांकाच्या रिसेप्शनला पोहोचला. साहजिकचं त्याची एन्ट्रीही शॉकिंग ठरली. प्रियांका व हर्मन यांच्या रिलेशनशिपची एकेकाळी जोरदार चर्चा रंगली होती. ‘लव स्टोरी 2050’ आणि ‘व्हाट्स योर राशी’ या चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांचेही प्रेम बहरात आले. पण अचानक हे नाते तुटले. हाच एक्स बॉयफ्रेन्ड काल प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये दिसला.
हर्मन बावेजासोबत प्रियांकाचे ब्रेकअप होण्यामागे कारण होते शाहिद कपूर. प्रियांकाच्या आयुष्यात शाहिदने एन्ट्री घेतली आणि हर्मन आऊट झाला. अर्थात पुढे शाहिद व प्रियांकाचेही ब्रेकअप झाले. पण याऊपर काल शाहिद कपूर प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये सामील झाला. एकटा नाही तर पत्नी मीरा राजपूतसोबत.