प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:07 PM2024-01-18T18:07:17+5:302024-01-18T18:18:18+5:30

Priyanka chopra: तुम्हाला माहितीये का मालती मेरी नावाचा अर्थ?

priyanka-chopra-nick-jonas-daughter-baby-girl-malti-marie-chopra-jonas-old-name-meaning | प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ

प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी इंडस्ट्रीची 'देसी गर्ल' म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). सध्या प्रियांकाचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. प्रियांका १५ जानेवारी २०२२ मध्ये सरोगसी पद्धतीने आई झाली. तिने एका गोड चिमुकलीला जन्म दिला. प्रियांकाने तिच्या लाडक्या लेकीचं नाव मालती मेरी असं ठेवलं असून मालती नुकतीच २ वर्षांची झाली आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे. यामध्येच प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव मालती मेरी असं का ठेवलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, या नावामागे एक खास कारण असल्याचं म्हटलं जातं.

काय आहे मालती मेरी या नावामागचा अर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव मालती मेरी ठेवण्यामागे एक भावनिक कारण आहे. देसी गर्लने तिच्या आई आणि सासूबाईंच्या नावावरुन आपल्या लेकीचं नाव ठेवलं आहे. प्रियांकाच्या आईचं नाव मधू मालती चोप्रा असं आहे. तर, निकच्या आईचं मिडल नाव मेरी आहे. त्यामुळे प्रियांकाने आपल्या लेकीच्या नावामध्येही आई आणि सासू यांच्या आई-वडिलांच्या नावाचा समावेश केल्याचं म्हटलं जातं. परंतु, या नावाविषयी प्रियांकाने अद्याप कोणताही खुलासा केला नाही.

दरम्यान, प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव चाहत्यांना सांगितल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला उधाण आलं होतं. अनेकांनी आपआपल्या परीने या नावाचा अर्थ काढण्यास सुरुवात केली होती. काहींच्या मते, मालती म्हणजे सुगंधित फूल वा चांदणी. तर, मेरी या नावाचा उल्लेख बायबलमध्ये केला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यांचा संगम घडवण्यासाठी प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी ठेवलं असं म्हटलं जातं.

Web Title: priyanka-chopra-nick-jonas-daughter-baby-girl-malti-marie-chopra-jonas-old-name-meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.