​प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका बनली सर्वात मादक आशियाई महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 11:26 IST2017-09-23T05:48:07+5:302017-09-23T11:26:56+5:30

जगातील सर्वात मादक आशियाई महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हिची नुकतीच निवड झाली आहे. विशेष म्हणजे चार वेळा ...

Priyanka Chopra leads Deepika into becoming the most sexy Asian woman! | ​प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका बनली सर्वात मादक आशियाई महिला !

​प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका बनली सर्वात मादक आशियाई महिला !

ातील सर्वात मादक आशियाई महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन हिची नुकतीच निवड झाली आहे. विशेष म्हणजे चार वेळा विजेती ठरलेल्या प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिकाने या यादीत पहिल्या क्रमांकावर जागा मिळविली आहे.  

ब्रिटनच्या ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्रात ही वार्षिक यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणाली की, ‘माझ्या चेहऱ्यावर या निवडीमुळे स्मित आले आहे. पण वेगवेगळ्या लोकांसाठी सेक्सी या शब्दाचा अर्थही वेगळा असतो. माझ्यासाठी हे केवल शारिरीक नाही, आत्मविश्वास सेक्सी आहे, साधेपणा आणि भापडेपणा सेक्सी आहे.’ जगभरातील लाखो लोकांनी २०१६ मध्ये सेक्सी महिला निवडण्यासाठी वोट दिले होते.

Related image

या यादीत दुसरा क्रमांक प्रियांका चोप्राने पटकावला असून, निया शर्मा तिसऱ्या स्थानावर आणि आलिया भट पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये सनाया इराणी-सहाव्या, कतरिना कैफ-सातव्या, सोनम कपूर-आठव्या, माहिरा खान-नवव्या आणि गोहर खान- दहाव्या क्रमांकावर आहे. 
दीपिका पादुकोनचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी झाला असून ती एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून ती बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘ओम शांती ओम’ हा असून आतापर्यंत तिने विविध भारतीय चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे. यावर्षी तिचा विन डिझेल सोबत ‘ट्रिपल एक्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

याव्यतिरिक्त दीपिका पादुकोनला अ‍ॅकेडमी आॅफ मोशन पिक्चर आॅफ एंड साइंसेज (एएमपीएएस) ची सदस्य बनवण्यात आले आहे. या गोष्टीची माहिती खुद्द दीपिकाने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन तिच्या फॅन्सना दिली होती. दीपिकाला मिळालेल्या या संधीमुळे ती स्वत:ला सन्मानित झाल्याचे समजते आहे तिने आपला हा आनंद ट्वीटरवरुन व्यक्त केला आहे.    

Web Title: Priyanka Chopra leads Deepika into becoming the most sexy Asian woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.