देसी गर्लचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; संजय लीला भन्साळींच्या सिनेमात लागली प्रियांकाची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:53 AM2024-03-22T09:53:21+5:302024-03-22T09:53:56+5:30

Priyanka chopra: प्रियांकाचा भारतदौरा खास कारणासाठी असल्याचं म्हटलं जात आहे.

priyanka-chopra-india-visit-focused-on-work-to-star-in-sanjay-leela-bhansali-next | देसी गर्लचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; संजय लीला भन्साळींच्या सिनेमात लागली प्रियांकाची वर्णी?

देसी गर्लचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; संजय लीला भन्साळींच्या सिनेमात लागली प्रियांकाची वर्णी?

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाने अमेरिकेत तिचा संसार थाटला आहे. इतंकच नाही तर सध्या बॉलिवूडपेक्षा ती हॉलिवूडमध्येच जास्त दिसते. त्यामुळे प्रियांका बॉलिवूडसिनेमांमध्ये कधी दिसणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडतो. मात्र, लवकरच प्रियांकाचं बी टाऊनमध्ये प्रियांकाचं कमबॅक होण्याची शक्यता आहे.

अलिकडेच प्रियांका भारतात आली असून काही दिवसांपूर्वीच तिने आयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं. मात्र, प्रियांका एका खास कारणासाठी भारतात आल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांका लवकरच काही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी ती मायदेशी परतली आहे.

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, प्रियांकाने हा भारतदौरा केवळ कामानिमित्ताने करत आहे. सध्या तिच्या हातात अनेक प्रोजेक्ट असून त्यावर ती फोकस करणार आहे. तिला अनेक गोष्टी लाइनअप करायच्या आहेत. बॅक टू बॅक मिटिंग्स आहेत. तसंच तिला तिच्या प्रोडक्शन हाऊसचं काम सुद्धा पाहायचं आहे. तिच्या प्रोडक्शन अंतर्गत ३-४ प्रोजेक्ट्स ती करणार असून त्यासंदर्भात तिला काही व्यक्तींची भेट घ्यायची आहे. त्यामुळे ती भारतात आल्याचं म्हटलं जात आहे.

संजय लीला भन्साळींच्यासिनेमात करणार काम?

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमाचं शेड्युल, कॉस्टच्युम, टाइमलाइन हे सगळं सेट करण्यासाठी ती संजय लीला भन्साळी यांची भेट घेणार आहे.

दरम्यान, प्रियांका तिच्या सिटाडेलच्या दुसऱ्या सिझनचीदेखील घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रियांकाने नुकतीच तिच्या वुमन ऑफ माय बिलियन डॉक्युमेंट्रीची घोषणा केली आहे. अमेझॉन प्राइमच्या एका इव्हेंटमेंट घोषणा केलेल्या या डॉक्युमेंट्रीमध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक महिलांची कथा उलगडली जाणार आहे.

Web Title: priyanka-chopra-india-visit-focused-on-work-to-star-in-sanjay-leela-bhansali-next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.