​‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते एकाचवेळी दहा मोठे चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 15:02 IST2017-11-12T09:32:15+5:302017-11-12T15:02:15+5:30

आजघडीला मोठी इंटरनॅशनल स्टार असलेल्या प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील संघर्षाच्या काळात बरेच नकार पचवले. या नकारामागचे कारण तिच्यात टॅलेन्टची कमतरता ...

Priyanka Chopra had to lose due to 'this' reason ten big films at the same time! | ​‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते एकाचवेळी दहा मोठे चित्रपट!

​‘या’ कारणामुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते एकाचवेळी दहा मोठे चित्रपट!

घडीला मोठी इंटरनॅशनल स्टार असलेल्या प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील संघर्षाच्या काळात बरेच नकार पचवले. या नकारामागचे कारण तिच्यात टॅलेन्टची कमतरता होती, हे नव्हते तर तिने स्वत: दिलेला नकार होते. गोंधळलात ना? होय, करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात अनेक मेकर्सनी प्रियांकाकडे ‘नको ती मागणी’ केली होती आणि प्रियांकाने त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. या नकारामुळे प्रियांकाला सुमारे दहा मोठे चित्रपट हातचे गमवावे लागले होते. खुद्द प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.



अलीकडे एका मुलाखतीत मधु चोप्रा यांनी याबाबत सांगितले. त्यांनी सांगितले की,‘एकदिवस एक डिझाईनर प्रियांकाकडे आला. दिग्दर्शकाला वाटतंय की तू तोकडे कपडे घालावेत, असे त्या डिझाईनरने प्रियांकाला सांगितले. मिस वर्ल्ड कॅमे-यापुढे आपले सौंदर्य दाखवणार नसेल तर तिला चित्रपटात घेऊन काय फायदा, असे या दिग्दर्शकाचे मत होते. प्रियांकाने  डिझाईनरची गोष्ट ऐकली आणि ताबडतोब त्या दिग्दर्शकाला नकार कळवला. प्रियांकापुढे तोकड्या कपड्यांची मागणी ठेवणारा दिग्दर्शक इंडस्ट्रीचा एक मोठा दिग्दर्शक होता. त्याला नकार दिल्यामुळे प्रियांकाला एकाचवेळी दहा मोठ्या प्रोजेक्टमधून काढून टाकले गेले.’ पुढे त्यांनी सांगितले की, ‘ प्रियांकाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले तेव्हा ती केवळ १७ वर्षांची होती. त्यामुळे मी कायम तिच्यासोबत असायचे. एकदा एका दिग्दर्शकाने प्रियांकाना स्क्रिप्ट ऐकण्यासाठी बोलवले. पण मी तुला एकट्यातच स्क्रिप्ट ऐकवू इच्छितो. तुझी आई सोबत नको, असे तो म्हणाला. याहीवेळी प्रियांकाने नकार दिला. माझी आई ऐकू शकत नसेल, अशा चित्रपटात मला काम करायचे नाही, असे तिने तडक सांगितले.’

ALSO READ: Trolled : ​प्रियांका चोप्रा, आता तुझ्या चेह-यावर वय दिसू लागलेयं...!

हार्वी विनस्टीन या हॉलिवूड निर्मात्यावर ब-याच अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप लावल्यानंतर सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.  या हॅशटॅगचा   विद्या बालन, प्रियांचा चोप्रा, रिचा चड्ढा या अभिनेत्रींनीही या महत्त्वाच्या मुद्यावर त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी स्वत: प्रियांकाने ‘प्रत्येकठिकाणी हार्वी विनस्टीन हजर आहे,’असे म्हटले होते.

Web Title: Priyanka Chopra had to lose due to 'this' reason ten big films at the same time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.