प्रियांका चोप्राचे होणारे सासरेबुवा कर्जबाजारी, कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 11:13 IST2018-09-03T11:12:35+5:302018-09-03T11:13:58+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा सिंगर निक जोनस यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.

priyanka chopra future father in law paul jonas company in trouble | प्रियांका चोप्राचे होणारे सासरेबुवा कर्जबाजारी, कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता

प्रियांका चोप्राचे होणारे सासरेबुवा कर्जबाजारी, कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता

मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा सिंगर निक जोनस यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. दोन्ही कुटुंबीय हे जोडले गेलेल्या नवीन नात्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना, प्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांसंबधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निक जोनसचे वडील पॉल जोनस यांच्या रिअल अॅक्टेक कंपनीवर 10 लाख डॉलरहून अधिक रकमेचं कर्ज आहे. यामध्ये त्यांची कंपनी केस हरल्या प्रकरणाच्या 2.68 लाख डॉलर्सचाही समावेश आहे. यादरम्यान, पॉल जोनस आपल्या मालमत्तेतील काही मालमत्तेचा विक्री करण्याचाही विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

2013 पर्यंत जॉन्स ब्रदर्सचा (निक, जो आणि केविन) एक बँड होता. मात्र बँडपासून विभक्त झाल्यानंतर निकनं सोलो परफॉर्मन्स देत स्वतः स्वतंत्र ओळख बनवली. ब्रदर जो आणि केविन जोनस देखील हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक आहेत. कथित माहितीनुसार हॉलिवूड सिंगर निक 2.5 कोटी डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. निक जोनस आणि प्रियांका चोप्राच्या रोका विधिसाठी पॉल जोनस पत्नी डेनिस जोनससहीत भारतात आले होते. या विधिनंतर प्रियांकानं पार्टीचंही आयोजन केले होते. या पार्टीसाठी केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आले होते. सोहळ्यात निकच्या आईनं प्रचंड धम्माल केली होती. प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि तिची होणारी सासू डेनिस जोनसचा डान्स व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. यामध्ये दोघींनीही पंजाबी गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

साखरपुडा जरी उरकण्यात आला असला तरीही प्रियांका-निकच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र बी-टाऊनमध्ये सुरू असलेल्या गॉसिप्सनुसार दोघंही या वर्षी लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: priyanka chopra future father in law paul jonas company in trouble