Malti Birthday Celebration: ६ महिन्यांची झाली प्रियंका चोप्राची लेक मालती; जंगी सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:55 AM2022-07-23T11:55:52+5:302022-07-23T12:02:00+5:30

Malti Birthday Celebration: प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने लाडकी लेकी मालती ६ महिन्यांची झाली म्हणून जंगी सेलिब्रेशन केलं.

Priyanka chopra celebrates daughter malti 6 months birthday throws grand party | Malti Birthday Celebration: ६ महिन्यांची झाली प्रियंका चोप्राची लेक मालती; जंगी सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल

Malti Birthday Celebration: ६ महिन्यांची झाली प्रियंका चोप्राची लेक मालती; जंगी सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल

googlenewsNext

Priyanka Chopra Daughter Malti Unseen Photo: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची मुलगी मालती हिचे फोटो आणि चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, जरी आतापर्यंत अभिनेत्रीने तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. प्रियंका चोप्राची मुलगी आता सहा महिन्यांची आहे आणि अभिनेत्रीने तिचा 40 वा वाढदिवस तसेच मालतीचा 6 वा बर्थ डे सेलिब्रेट केला. यादरम्यानचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


प्रियंकाने शेअर केले फोटो
समोर आलेल्या या फोटोंमध्ये प्रियांका आणि निक मुलीला कडेवर घेऊन दिसतायेत. तर मालती क्यूट फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या ड्रेसवर ६ महिने असे लिहिले आहे. यासोबतच मालतीचा खास केकही फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. आता सर्वजण मालतीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रियंका चोप्राने मालतीच्या चेहरा हार्ट इमोजीने लपवला आहे.

प्रियंकाने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत आणि लांब लचक पोस्टमधून सर्वांचे आभार मानले आहेत. प्रियांकाने निकचे विशेष आभार मानले कारण निकनेच तिच्यासाठी ही पार्टी ठेवली होती. 

प्रियंका चोप्राने 18 जुलै रोजी तिचा 40 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास प्रसंगी तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र जमले होते. प्रियंकाचा हा वाढदिवस देखील खास होता कारण ती पहिल्यांदाच तिची मुलगी मालती मेरीसोबत सेलिब्रेट करत होती. प्रियंकाने बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले होते पण तिने तिच्या मुलीसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. दरम्यान, तिची बेस्ट फ्रेंड  तमन्ना दत्तची एक पोस्ट समोर आली होती ज्यामध्ये प्रियांका तिच्या मुलीला घेऊन उभी होती. 

Web Title: Priyanka chopra celebrates daughter malti 6 months birthday throws grand party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.