प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'या' व्यक्तीसोबत सेलिब्रेट केली होळी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:44 IST2017-03-14T11:02:36+5:302017-03-15T12:44:58+5:30

या फोटोंमध्ये प्रियांका खूप धमाल मस्ता करताना दिसते आहे. चॅट शोच्या मंचावर प्रियांका आणि जिमी दोघेही रंगने माखलेले दिसता ...

Priyanka Chopra celebrated Holi with 'this' person in New York! | प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'या' व्यक्तीसोबत सेलिब्रेट केली होळी !

प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'या' व्यक्तीसोबत सेलिब्रेट केली होळी !

फोटोंमध्ये प्रियांका खूप धमाल मस्ता करताना दिसते आहे. चॅट शोच्या मंचावर प्रियांका आणि जिमी दोघेही रंगने माखलेले दिसता येत. 



शोनंतर प्रियांकाने न्यूयॉर्क मधल्या आपल्या घरी होळीची पार्टी दिली. सध्या प्रियांका  क्वांटिको या अमेरिकी टीव्ही शोमुळे अमेरिकतेला एक व्हेलनोन फेस बनली आहे. सध्या ती बेवॉच या चित्रपटाव्दारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. लवकरच बेवॉच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती व्हिक्टोरिया नावाच्या नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. याचित्रपटासाठी दिलेल्या मुलाखती दरम्यान प्रियांका म्हणाली माझे निर्णय मी स्वत: घेते आणि माझे कुटुंबीय मला यासाठी सपोर्ट करतात. माझ्या कुटुंबीयांमुळे माझ्यात ऐवढा सेल्फ कॉन्फिडन्स आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांकाचे वास्तव अमेरिकेत आहे.. बेवॉचच्या प्रमोशनसाठी प्रियांका ड्वेन जॉन्सन ऊर्फ द रॉक भारतात येणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोणने ही ट्रिपल एक्स रिटर्न ऑफ जेंडर केज या तिच्या हॉलिवूडपटासाठी विने डिझेलला भारतात आणले होते. त्यामुळे दीपिकाला टक्कर देण्यासाठी प्रियांका ही आपल्या चित्रपटातील हिरोला भारताता घेऊन येणार असल्याचे समजतंय. प्रियांका काही महिन्यांपूर्ऴी झालेल्या अॅवॉर्ड सोहळ्यासाठी भारतात आली होती. मात्र त्या अॅवॉर्ड सोहळा झाल्यावर ती परत अमेरिकेत परतली आहे. प्रियांकाचे चाहते तिची भारत पुर्नआगमानाची आतुरतेने वाट पाहत आहे. 
 

Web Title: Priyanka Chopra celebrated Holi with 'this' person in New York!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.