प्रियंका चोप्रा एका महिलेच्या मदतीला आली धावून,व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटणार अभिमानास्पद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 11:03 IST2019-06-15T10:58:13+5:302019-06-15T11:03:06+5:30
प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'द स्काई इज पिंक' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी पार पडली.

प्रियंका चोप्रा एका महिलेच्या मदतीला आली धावून,व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटणार अभिमानास्पद
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे प्रियंकाचे तिचे फॅन्सही खूप कौतूक करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रियंका एका महिलेला साडी नेसवण्यासाठी मदत करत असल्याचे पाहायला मिळतंय. झाले असे की, भर रस्त्यात अचानक एका महिलेची साडी सुटल्याचे प्रियंकाने पाहिले आणि त्या महिलेला साडी नेसतानाची तारांबळ उडत असल्याचे पाहात खुद्द प्रियंका तिच्या मदतीसाठी धावून आली. महिलेला साडी नेसवताना पाहून उपस्थितांनीही प्रियंकाचे खूप कौतूक वाटले.
हाच व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला तेव्हा सारेच प्रियंकाचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही काही पहिली वेळ नाही ज्यावेळी प्रियंकाने अशा प्रकारे कोणाची मदत केली असावी. प्रियंका आपल्या परीने सर्वसामान्याची मदत करत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजवणारी पिग्गी चॉप्स यशाच्या शिखरावर असली तरी तिचे पाय जमीनीवरच असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'द स्काई इज पिंक' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी पार पडली. बऱ्याच कालावधीपासून प्रियंकाने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. आता तिला द स्काई इज पिंक चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.