​ प्रियांका चोप्रा बनली जगातील ८ व्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:04 IST2017-09-27T08:16:38+5:302017-09-27T14:04:32+5:30

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगातील सर्वाधिक कमाई करणारी आठव्या क्रमांकाची टीव्ही अभिनेत्री बनली आहे. होय, ...

Priyanka Chopra became the world's 8th highest grossing TV actress! | ​ प्रियांका चोप्रा बनली जगातील ८ व्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री!

​ प्रियांका चोप्रा बनली जगातील ८ व्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री!

लिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगातील सर्वाधिक कमाई करणारी आठव्या क्रमांकाची टीव्ही अभिनेत्री बनली आहे. होय, जगातील सर्वाधिक कमाई करणा-या टॉप टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाने आठवे स्थान मिळवले आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शोमुळे प्रियांकाने अपार लोकप्रीयता मिळवली आणि प्रियांकाने ही लोकप्रीयता अगदी योग्यरित्या ‘कॅश’ केली. 
मंगळवारी फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणा-या टीव्ही अभिनेत्रींची यादी जाहिर केली. फोर्ब्सची ही यादी १ जून २०१६ ते १ जून २०१७ या काळात अभिनेत्रींनी केलेल्या कमाईवर आधारित आहे. या यादीत  ६५ कोटींची कमाई करत प्रियांकाने आठवा क्रमांक मिळवला आहे. या यादीत प्रियांकाने दुस-यांदा स्थान मिळवले आहे. यापूर्वी ‘क्वांटिको’ शो आॅन एअर झाला त्यावर्षी म्हणजे २०१६ मध्ये प्रियांकाने ७१.५ कोटींची कमाई केली होती. २०१७ मध्ये ‘क्वांटिको’च्या दुस-या सीझनमध्येही ती दिसली होती. यापाठोपाठ याशिवाय ड्वेन जॉनसनसोबत ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटातही ती दिसली होती. सध्या प्रियांका ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ व ‘अ किड लाइक जॅक’ या दोन हॉलिवूड चित्रपटांत बिझी आहे. याशिवाय ‘क्वांटिको’च्या तिस-या सीझनचे शूटींगही तिने सुरु केले आहे. 

ALSO READ : ‘न्यूटन’च्या आॅस्करवारीवर प्रियांका चोप्रा नाखूश! जाणून घ्या का?

कोलंबियाची सोफिया वेरगारा ही या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या सहा वर्षांत सोफिया या यादीत पहिला क्रमांक राखून आहे.  १ जून २०१६ ते १ जून २०१७ या काळात सोफियाने २७१ कोटी रूपयांची कमाई केली आहे. ‘बिग बँग थ्योरी’ या लोकप्रीय टीव्ही शोची स्टार काले कुआको फोर्ब्सच्या या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. कालेने १७० कोटींची कमाई करत या यादीत आपले दुसरे स्थान पक्के केले आहे. ‘ग्रे की एनाटॉमी’ व ‘मिंडि कालिंग’ची स्टार एलेन पोम्पेओ हिने तिसरे स्थान पटकावले आहे.  यापाठोपाठ अभिनेत्री मारिकस्का हार्गिते, सोफिया वर्गारा, केरी वॉश्ंिगटन या तिघींनी या यादीत अनुक्रमे पाचवे, सहावे व सातवे स्थान मिळवले आहे.

Web Title: Priyanka Chopra became the world's 8th highest grossing TV actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.