"ज्यांनी चित्रपट पाहिला ते मूर्ख ..." 'धुरंधर २'ला 'प्रपोगंडा' म्हणणाऱ्यांना प्रियदर्शन यांचं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:19 IST2026-03-30T12:18:33+5:302026-03-30T12:19:39+5:30

आदित्य धरचं दिग्दर्शन, कथा आणि कलाकारांचा अभिनय एकूणच सगळं उत्तम असल्याने सिनेमाची सर्वत्र वाहवाह होते आहे. एकीकडे काहींनी या चित्रपटाला प्रपोगंडा असल्याचं म्हटलं आहे.

Priyadarshan Reacts Dhurandhar 2 Success Propaganda Row Ranveer Singh Bhooth Bangla Update | "ज्यांनी चित्रपट पाहिला ते मूर्ख ..." 'धुरंधर २'ला 'प्रपोगंडा' म्हणणाऱ्यांना प्रियदर्शन यांचं स्पष्ट उत्तर

"ज्यांनी चित्रपट पाहिला ते मूर्ख ..." 'धुरंधर २'ला 'प्रपोगंडा' म्हणणाऱ्यांना प्रियदर्शन यांचं स्पष्ट उत्तर

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर यशाचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत.  फक्त प्रेक्षकच नाहीतर अनेक कलाकार देखील हा सिनेमा पाहून भरभरून कौतुक करत आहे. आदित्य धरचं दिग्दर्शन, कथा आणि कलाकारांचा अभिनय एकूणच सगळं उत्तम असल्याने सिनेमाची सर्वत्र वाहवाह होते आहे. एकीकडे काहींनी या चित्रपटाला प्रपोगंडा असल्याचं म्हटलं आहे.  याच पार्श्वभूमीवर, आता दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मौन सोडले असून टीकाकारांचा समाचार घेतला आहे.

सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना प्रियदर्शन यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' या दोन्ही चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारले आहे. ते म्हणाले, "यात 'प्रपोगंडा' असं काहीही नाही. तुम्ही केवळ जनतेसमोर सत्य मांडत आहात. जेव्हा संपूर्ण भारताने या चित्रपटाला आपलं मानलं आहे, तेव्हा मोजक्याच काही व्यक्तींच्या नकारात्मक मतांना इतके महत्त्व का द्यावे?".

जनतेच्या कौलाचा अनादर करू नका
चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाचा दाखला देत प्रियदर्शन पुढे म्हणाले, "ज्या करोडो लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते खरोखरच मूर्ख आहेत असे तुम्हाला वाटते का? हा जनतेचा कौल आहे आणि तो जनतेवरच सोडून द्यावा. या यशाचा विरोध करू नका, उलट या चित्रपटाला त्याचे यश उपभोगू द्या. यापेक्षा मोठा हिट चित्रपट दुसरा असूच शकत नाही".

प्रियदर्शन सध्या त्यांच्या आगामी 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तब्बल १५ वर्षांनंतर ते पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत काम करत असून, हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल आणि राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

आगामी चित्रपट 'हैवान'
'भूत बंगला' व्यतिरिक्त प्रियदर्शन सध्या 'हैवान' नावाच्या एका बिग बजेट चित्रपटावरही काम करत आहेत. यामध्ये सैफ अली खान आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे.

Web Title : प्रियदर्शन ने 'धुरंधर 2' के आलोचकों को लताड़ा: देखने वाले मूर्ख नहीं।

Web Summary : निर्देशक प्रियदर्शन ने 'धुरंधर 2' को प्रोपेगेंडा बताने वालों की आलोचना की और इसकी व्यापक स्वीकृति पर जोर दिया। उन्होंने फिल्म की सफलता और जनता के फैसले को कम आंकने वाले आलोचकों पर सवाल उठाए। प्रियदर्शन फिलहाल 'भूत बंगला' और 'हैवान' पर काम कर रहे हैं।

Web Title : Priydarshan slams 'Dhurandhar 2' critics: Those who watched are not fools.

Web Summary : Director Priyadarshan defends 'Dhurandhar 2' against propaganda claims, emphasizing its widespread acceptance. He questions critics who undermine the film's success and public's verdict. Priyadarshan is currently working on 'Bhoot Bangla' and 'Haiwan'.