प्राचार्य म्हणाले, कॉलेजला येऊ नकोस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 19:04 IST2016-04-10T21:19:51+5:302016-04-10T19:04:22+5:30

फिल्म सेलिब्रेटी म्हटले की, त्यांचे ग्लॅमर लक्षात येते. जिथे जातील तिथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीवर ...

Principal said, do not come to college! | प्राचार्य म्हणाले, कॉलेजला येऊ नकोस!

प्राचार्य म्हणाले, कॉलेजला येऊ नकोस!

ल्म सेलिब्रेटी म्हटले की, त्यांचे ग्लॅमर लक्षात येते. जिथे जातील तिथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीवर मीडिया आणि चाहत्यांची नजर असते.

ते कोणते कपडे घालतात, कशी हेअरस्टाईल ठेवतात, कोणते शूज वापरतात, कसे बोलतात याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असते. आणि त्यातल्या त्यात अभिनेत्री असेल तर ‘कॅमेऱ्या’ची नजर आणखी बारीक असते. पण आज ज्यांना आपण कॉन्फिडंट, स्मार्ट अभिनेत्री म्हणून पाहतो त्यांचे कॉलेज लाईफ कशी होती, त्या लहानपणीदेखील एवढ्याच कॉन्फिडंट असतील का?

रविना टंडन तर म्हणते की, बिल्कुल नाही. नुकतेच ‘सीएनएक्स’शी एक्सक्लुझिव्ह बोलताना तिने सांगितले की, आठवीपर्यंत मी एकदम साधारण लाजरीबुजरी मुलगी होते. आपण कसे दिसतो, आपल्याबद्दल लोक काय विचार करतील या विचाराने मी आत्मविश्वास गमावला होता. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर येत असूनही मी हात वर करत नसे. मी जर हात वर केला तर सगळे जण माझ्याकडे पाहतील. आपल्या दिसण्यावरून चिडवतील याची भीती वाटायची. त्यामुळे माझे शालेय जीवन खूप छान नव्हते.

नव्वदच्या दशकात अनेक नवीन चेहरे चंदेरी पडद्यावर झळकले. त्यांपैकी एक अविस्मरणीय नाव म्हणजे रविना टंडन. कॉलेजच्या दुसºया वर्षात शिकत असतानाच 1991 साली तिने ‘पत्थर के फुल’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या रविनाने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘अंदाज अपना अपना’ अशी सुपरहीट चित्रपटांची हॅट्रीक केली. तिची प्रसिद्धी पाहता कॉलेजच्या प्राचार्यांना चिंता वाटू लागली. 

हा मजेशीर किस्सा शेअर करताना ती म्हणाली की, प्राचार्यांनी मला बोलावले आणि सांगितले की, तु हीरोईन झाल्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये मुलांची होणारी गर्दी काही केल्या कमी होत नाहीए. तु एक काम कर. कॉलेजला येण्याऐवजी ‘कॉरस्पाँडंट’ विद्यार्थिनी म्हणून अ‍ॅडमिशन घे. त्यामुळे मला एक्सटर्नलद्वारे शिक्षण पूर्ण करावे लागले.

आता ‘स्टार’ म्हटल्यावर अशा गोष्टी तर होणारच ना. असो. पण रविना तुला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यास सर्व चाहत्यांना नक्कीच आवडेल, नाही का!

Web Title: Principal said, do not come to college!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.