पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटला लागली सिनेमाची लॉटरी, या कन्नड सिनेमातून झळकणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 15:55 IST2018-05-01T10:25:15+5:302018-05-01T15:55:15+5:30
राम और श्याम, सीता-गीता, किशन-कन्हैय्या अशा बॉलीवुडच्या विविध सिनेमात आपण डबल रोल पाहिले आहेत. रिअल लाइफमध्ये जुळे बहिण भाऊ ...

पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटला लागली सिनेमाची लॉटरी, या कन्नड सिनेमातून झळकणार रुपेरी पडद्यावर
र म और श्याम, सीता-गीता, किशन-कन्हैय्या अशा बॉलीवुडच्या विविध सिनेमात आपण डबल रोल पाहिले आहेत. रिअल लाइफमध्ये जुळे बहिण भाऊ असतात हेसुद्धा आपल्याला माहिती आहे. इतकेच नाही तर एकाच चेह-याच्या आणि सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती असतात जगात असतात असं म्हटलं जातं. अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये एम.पी. रामचंद्रन यांचा उल्लेख करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डुप्लिकेट अशी एम.पी. रामचंद्र यांची ओळख. खुद्द पंतप्रधानांचे डुप्लिकेट म्हटलं की एम.पी. रामचंद्रन यांना प्रसिद्धी तर मिळणारच होती. मात्र हाच चेहरा त्यांना सिनेमाची संधी मिळवून देईल याची कल्पना खुद्द रामचंद्रन यांनी कधीच केली नसणार. मात्र हे प्रत्यक्षात घडले आहे. पंतप्रधान मोदींसारखा चेहरा असल्याने एम.पी. रामचंद्रन यांना चक्क सिनेमाची लॉटरी लागली आहे. दिग्दर्शक अप्पी प्रसाद यांच्या नोटाबंदीवर आधारित एका कन्नड सिनेमात पंतप्रधान मोदी यांची व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी त्यांना लाभली आहे. स्टेटमेंट 8/11 असं या कन्नड सिनेमाचे नाव आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेत काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. याच रिअल घोषणेची रिल घोषणा एम.पी. रामचंद्रन करताना दिसतील. या सिनेमाच्या काही भागाचं शुटिंग पार पडलं आहे. यांत नोटाबंदीच्या घोषणेच्या सीनचाही समावेश आहे. वर्षभरापूर्वी रेल्वे स्टेशनवर एम. पी. रामचंद्रन उभे होते. त्यावेळी कुणीतरी त्यांची ती छबी कॅमे-यात कैद केली. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. आता मोदींसारखा चेहरा असल्याने त्यांना सिनेमाचीही लॉटरी लागली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका असलेला हा सिनेमा रसिकांना कितपत भावतो हे पाहणं रंजक ठरेल.