Priceless Moments : चिमुकल्या आहिलची मामा सलमान खानसोबत मस्ती; पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 14:14 IST2017-02-09T07:26:49+5:302017-02-09T14:14:36+5:30

सुपरस्टार सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाची शूटिंग नुकतीच संपली आहे. त्याचबरोबर रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसही संपल्याने सलमान सध्या ...

Priceless Moments: Mummy with Mum Salman Khan; View Photos | Priceless Moments : चिमुकल्या आहिलची मामा सलमान खानसोबत मस्ती; पहा फोटो

Priceless Moments : चिमुकल्या आहिलची मामा सलमान खानसोबत मस्ती; पहा फोटो

परस्टार सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाची शूटिंग नुकतीच संपली आहे. त्याचबरोबर रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसही संपल्याने सलमान सध्या बºयापैकी फ्री आहे. अशात तो बराचसा वेळ भाचा आहिलसोबत व्यतीत करीत असून, दोघेही भरपूर धमाल मस्ती करीत आहेत. त्यांच्या या मस्तीचे काही फोटो सलमानची बहीण अर्पिता खान हिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, कॅप्शनमध्ये ‘Priceless Moments’ असे लिहले आहे. 



या फोटोंमध्ये सलमान जमिनीवर झोपलेला असून, आहिल त्याच्या पोटावर उभा आहे. आहिलचे दोन्ही हात तोंडात असल्याने तो खूपच क्यूट दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये आहिल सलमानच्या चेहºयावर दोन्ही हात ठेवून मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. वास्तविक सलमान नेहमीच फावल्या वेळेत भाचा आहिलसोबत वेळ व्यतित करण्याची एकही संधी सोडत नसतो. यापूर्वीदेखील त्याने बºयाचदा आहिलसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

सलमानची लहान बहीण अर्पिता हिचा विवाह बिझनेस मॅन आयुष शर्मा याच्याबरोबर २०१४ मध्ये झाला होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात अर्पिताने आहिलला जन्म दिला. सध्या खान परिवारात आहिल हा सर्वात लहान सदस्य असल्याने सलमानसह सगळ्यांचाच तो लाडका आहे. मात्र आहिलला सर्वाधिक लगाव मामा सलमान खानशी असल्याचे बघावयास मिळते. त्यामुळेच बºयाचदा आहिल सलमानची शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणीही पोहचला आहे. काही दिवसांपूर्वीच तो बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता.  



सध्या सलमान फ्री असल्याने त्याला बºयाचसा वेळ आहिलसोबत व्यतित करण्याची संधी मिळत आहे. दोघेही भरपूर मस्ती करीत असल्याचे फोटोवरून बघावयास मिळते. 

Web Title: Priceless Moments: Mummy with Mum Salman Khan; View Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.