​विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनचा डोज तयार : ‘कमांडो २’ चे टिझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:33 IST2017-01-21T16:18:15+5:302017-01-22T14:33:36+5:30

विद्युत जामवाल याची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो’ या  सिनेमाचा सिक्वल म्हणजे ‘कमांडो २’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

Prepare Dosage Action of Electric Jamwal: Tizar Release for 'Commando 2' | ​विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनचा डोज तयार : ‘कमांडो २’ चे टिझर रिलीज

​विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनचा डोज तयार : ‘कमांडो २’ चे टिझर रिलीज

द्युत जामवाल याची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो’ या  सिनेमाचा सिक्वल म्हणजे ‘कमांडो २’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते तर आता टिझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून यात दमदार अ‍ॅक्शन दृष्ये असतील यात शंकाच नाही.  विद्युत जम्मवाल आणि अदा शर्मा यांची यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ईशा गुप्ताचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

‘कमांडो २’ या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल काळ्या धनाचा पाठलाग करताना दिसणार आहे. देवेन म्हणाला, ‘कमांडो’ चित्रपटाची कथा सोपी होती. लोकांना हा चित्रपट आवडला होता. आम्ही या चित्रपटाच्या सिक्वलचा विचार करीत असतानाच याची कथा रहस्यपटासारखी असावी असा विचार मांडला. यामुळे हा विषय काळ्या पैशाचा शोध घेणारा असावा असे ठरले. याविषयावर चित्रपट तयार करण्यात आलेला नाही. यामुळे कथा लेखनासाठी आम्ही रितेश शहा यांच्याशी चर्चा केली. Read More : ​विद्युत जामवालच्या ‘कमांडो २’ प्रदर्शनाची तारीख बदलली



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये विद्युतच्या डोळ्याला डॉलरच्या नोटांनी झाकल्याचे दिसत होते. विद्युतच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिल्याचे पाहायला मिळत आहे. देवेन भोजानी यांच्या ‘कमांडो २’ या चित्रपटात एक राजकारणी काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी क ठोर पावले उचलित असल्याचे दाखविण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या  कमांडोचे साधर्म्य सध्याच्या परिस्थितीशी जुळत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. नोटाबंदी मुळे या चित्रपटाची तारीख बदलून ३ मार्च करण्यात आली होती. Read More : ​‘कमांडो २’मध्ये दिसणार काळ्या पैशांवरील सर्जिकल स्टाईक!

   

Web Title: Prepare Dosage Action of Electric Jamwal: Tizar Release for 'Commando 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.