दिलजितसिंग दूसांजच्या या चित्रपटाचा होणार या तारखेला प्रीमिअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 11:59 IST2018-04-04T06:28:51+5:302018-04-04T11:59:14+5:30
आपल्या सुपरसिंग या नव्या सुपरहिरोला भेटा! तो हवेत उडू शकतो, गुंडांशी सहजतेने हाणामारी करू शकतो आणि जगाला वाचविताना तुम्हाला ...

दिलजितसिंग दूसांजच्या या चित्रपटाचा होणार या तारखेला प्रीमिअर!
आ ल्या सुपरसिंग या नव्या सुपरहिरोला भेटा! तो हवेत उडू शकतो, गुंडांशी सहजतेने हाणामारी करू शकतो आणि जगाला वाचविताना तुम्हाला हसवून हसवून तुमची करमणूकही करू शकतो! एकता कपूरनिर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सुपरसिंग’ या चित्रपटाचा ‘जागतिक टीव्ही प्रीमिअर’ शुक्रवार, 6 एप्रिल रोजी रात्री 8.00 वाजता सर्व ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाहिनी’ असलेल्या ‘झी सिनेमा’वर प्रसारित केला जाणार आहे.या विनोदी सुपरहिरो कॉमेडीत दिलजितसिंग दूसांज आणि सोनम बाज्वा हे प्रमुख भूमिकेत असून पवन मल्होत्रा हा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.सज्जनसिंग या साध्या शीख तरूणाला नकळत काही दैवी शक्ती प्राप्त झाल्यावर तो जी धाडसे करतो, त्याचे धमाल चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
हा पूर्णपणे दिलजितसिंग दूसांज या अभिनेत्याला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला चित्रपट असून आपले मिश्किल आणि खुसखुशीत संवाद, विनोदाचे अचूक टायमिंग आणि यामुळे प्रेक्षकांना गुदगुल्या होत राहतील. चित्रपटात ‘हवा विच’सारखी काही सुरेल आणि लोकप्रिय गाणी असून ती सुनिधी चौहान आणि दिलजितसिंग दूसांज यांनी आपल्या दमदार आवाजांत गायली आहेत. आपल्याला प्राप्त झालेल्या या दैवी शक्तींची सज्जनसिंगला जाणीव होताच हा चित्रपट प्रेक्षकांना पंजाबातील हिरव्यागार शेतांपासून कॅनडातील मॉन्ट्रीयालच्या निसर्गरम्य परिसराची सफर घडवून आणतो.कॅनडातील मॉन्ट्रीयालमध्ये आपल्या आईबरोबर मजेत जीवन जगणारा सज्जनसिंग (दिलजितसिंग दूसांज) हा एक साधा शीख तरूण असतो. तो मनाने दिलदार असून ट्विंकल (सोनम बाज्वा) हिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेम असते.पण तो मनाने इतका निष्पाप असतो की त्याला सोनमला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम समजत नाही. दरम्यान, पंजाबमध्ये दैवी शक्ती असलेली एका केशरी पगडी प्राप्त करण्यासाठी काही गुंड प्रयत्न करीत असतात.कॅनडात विनोदी चुटके सांगून आणि
भांगडा नृत्याने एका चिअरलीडर मुलीचे मन जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा सज्जनसिंग पंजाबमध्ये दाखल होतो.तिथे त्याला दिसते की काही राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना सामान्य जनतेला मूर्ख बनवून त्यांना लुबाडत आहेत.दैवी शक्ती असलेली ती पगडी काही कारणाने सज्जनसिंगच्या हाती पडते आणि मग त्याचे रुपांतर एका सुपरहिरोत होते.या शक्ती प्राप्त केल्यावर सज्जनसिंगला प्रेम, त्याग, जबाबदारी, कुटुंब, जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे, हेही त्याला कळून चुकते.