​दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेफिक्रे’चा प्रिमिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 18:06 IST2016-11-15T18:06:03+5:302016-11-15T18:06:03+5:30

आदित्य चोप्रा दिग्दर्शित आगामी बेफिक्रे या चित्रपटाचा १३ व्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (डीफ्फ)प्रिमीअर शो दाखविला जाणार आहे. ७ ...

The premiere of 'Biffere' at the Dubai Film Festival | ​दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेफिक्रे’चा प्रिमिअर

​दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेफिक्रे’चा प्रिमिअर

ong>आदित्य चोप्रा दिग्दर्शित आगामी बेफिक्रे या चित्रपटाचा १३ व्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (डीफ्फ)प्रिमीअर शो दाखविला जाणार आहे. ७ ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाºया ‘डीफ्फ’मध्ये जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन केले जाते. 

मागील १३ वर्षांपासून दुबई येथे आयोजित होत असलेला दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन व प्रयोगशील सिनेमाचे प्रदर्शन क रण्यात येते. आदित्य चोप्राच्या रोमँटिक कॉमेडी ‘बेफिक्रे’चे प्रदर्शन रेड कार्पेट गाला अंतर्गत ८ डिसेंबरला करण्यात येणार आहे. २१ व्या शतकातील बदलत जाणारी प्रेमाची संकल्पना व प्रेरणा ‘बेफिके्र’मध्ये दाखविली जाणार असल्याने याची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘बेफि क्रे’चा अर्थ म्हणजे काळजी नसलेले असा आहे, इंग्रजीत केअरफ्री या चित्रपटात धरम (रणवीर सिंह) व श्रेया (वाणी कपूर) प्रेम शोधण्यासाठी आवेग, अनुभव व गुंतागुंतीच्या मालिकांमध्ये अडकतात. 

यश राज फिल्म्स मध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आदित्य चोप्रा दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. यश राज फि ल्म्सचा हा नवा चित्रपट प्रवासी भारतीयांसाठी व अरब देशाचे भारताशी नाळ घट्ट करणारा ठरणार असून, यामुळे अनेक लोक याकडे आकर्षित होतील असे मत ‘डिफ्फ’चे अध्यक्ष अब्दुलामीद जुमा यांनी सांगितले. 

यशराज फिल्म्सचे आॅपरेशन्स् हेड नेल्सन डिसुजा म्हणाले, ‘डिफ्फ’मध्ये  यशराज फिल्म्सचे अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. आमच्या चित्रपटाचे प्रदर्शन होणे हा आमचा सन्मान आहे. आगामी ‘बेफिके्र ’ हा चित्रपट यशराज बॅनरचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याने ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. 
यापूर्वी ‘दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये यशराजचे ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘रॉकेट सिंग : सेल्समॅन आॅफ द इअर’ व ‘लेडिझ व्हर्सेस रिकी बहेल’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. 

Web Title: The premiere of 'Biffere' at the Dubai Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.