प्रेग्नेंट करिना रेडी फॉर वर्क!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 20:16 IST2016-07-16T14:46:49+5:302016-07-16T20:16:49+5:30
डिसेंबरमध्ये आमच्या घरी पाळणा हलणार, असे हबी सैफ अली खानने जाहिर केले आणि करिना कपूरच्या प्रेग्नंसीबाबतच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम ...
.jpg)
प्रेग्नेंट करिना रेडी फॉर वर्क!!
ड सेंबरमध्ये आमच्या घरी पाळणा हलणार, असे हबी सैफ अली खानने जाहिर केले आणि करिना कपूरच्या प्रेग्नंसीबाबतच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. करिना प्रेग्नंट आहे, हे सगळ्यांना कळले. आता प्रेग्नंसीदरम्यान करिना कामाला ब्रेक लावणार, असाच अंदाज होता. पण नाही, तसे नाहीय. प्रेग्नंसीची बातमी कन्फर्म झाल्यानंतर करिना प्रथमच कॅमेरा फेस करण्यास एकदम सज्ज आहे. होय, फरहान अख्तरची एक्स-वाईफ अधुना अख्तर हिच्या ब्रँण्डसाठी करिना लवकरच अॅड शूट करतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना आई होणार ही बातमी सर्वांना कळल्यानंतरचे करिनाचे हे पहिले शूट आहे. १९ जुलै ते २० जुलै या काळात करिना हे शूट करणार आहे. आणखी एक नवी बातमी म्हणजे, करिनाच्या आगामी ‘वीरा दी वेडींग’ या चित्रपटात अधूना हीच करिनाची हेअरस्टाईलिस्ट आहे. त्यामुळे अधूना आणि करिना सध्या जाम एक्ससाईटेड आहेत...तेव्हा आॅल दी बेस्ट करिना!