आता प्रेग्नंट करिना कपूरला चालणे-फिरणेही झाले कठीण, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 17:46 IST2020-11-08T17:39:14+5:302020-11-08T17:46:01+5:30

सध्या बेबो तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे.  

pregnant kareena kapoor shooting at mehboob studio bollywood actress cant walk properly with baby bump | आता प्रेग्नंट करिना कपूरला चालणे-फिरणेही झाले कठीण, फोटो व्हायरल

आता प्रेग्नंट करिना कपूरला चालणे-फिरणेही झाले कठीण, फोटो व्हायरल

ठळक मुद्देकरिना कपूरच्या प्रेग्नंसीमुळे ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाचा सीक्वल मात्र रखडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या बेबो तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे.  
रविवारी करिना मेहबूब स्टुडिओत पोहोचली. या स्टुडिओबाहेरील तिचे काही फोटो व्हायरल झालेत. या फोटोत करिनाचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना करिनाला त्रास होतोय, हे फोटोत स्पष्टपणे दिसतेय. व्हॅनीच्या पाय-या उतरण्यासाठी आता तिला मदत घ्यावी लागतेय.

यावेळी करिनाने फोटोग्राफर्सला पोज दिल्यात. मात्र हाताने इशारा करत, दूरून फोटो काढण्याचे तिने बजावले. 
तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असतानाही करिना प्रसूतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह होती. यादरम्यान तिने अनेक जाहिरातींचे शूटींग केले होते.

यावेळी तिने प्रेग्नंसीकाळात एका सिनेमाचे शूट केले. होय, आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

पुन्हा ही गोष्ट करायची नाही
अलीकडे एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुसºया प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती. तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना मला सर्वांनी खूप खाण्याचा सल्ला दिला होता आणि मी नुसते खात सुटले होते. यामुळे माझे वजन 25 किलो वाढले होते. आता मला पुन्हा असे करायचे नाही. मला फक्त हेल्दी व फिट राहायचे आहे, असे ती म्हणाली होती.

रखडला ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वल
करिना कपूरच्या प्रेग्नंसीमुळे ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाचा सीक्वल मात्र रखडला आहे. ‘वीरे दी वेडिंग’चा दुसरा पार्ट बनवण्याची तयारी सुरु झाली असतानाच करिना प्रेग्नंट राहिली. यामुळे निर्माता निखील द्विवेदी यांनी शूटींगचा बेत रद्द केला. आता करिनाची प्रसूती झाल्यानंतर या सिनेमावर पुन्हा काम सुरु होईल. 

करिना व सैफचे दुसरे बाळ असेल ‘कोरोनियल ’; काय होतो याचा अर्थ?

दरवेळी मुलींनाच का विचारले जातात असे प्रश्न ? करिना कपूर भडकली

Web Title: pregnant kareena kapoor shooting at mehboob studio bollywood actress cant walk properly with baby bump