करिना व सैफचे दुसरे बाळ असेल ‘कोरोनियल ’; काय होतो याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:22 PM2020-10-20T16:22:25+5:302020-10-20T16:23:45+5:30

लवकरच बेबो दुस-यांदा आई होणार आहे. 

Kareena Kapoor and Saif Ali Khan to have a 'coronial' baby. Here is what it means | करिना व सैफचे दुसरे बाळ असेल ‘कोरोनियल ’; काय होतो याचा अर्थ?

करिना व सैफचे दुसरे बाळ असेल ‘कोरोनियल ’; काय होतो याचा अर्थ?

Next
ठळक मुद्दे16 ऑक्टोबर 2012 रोजी बेबो व सैफू लग्नबंधनात अडकले होते. 2016 मध्ये बेबो आई झाली.

करिना कपूर आणि सैफ अली खान आपल्या दुस-या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. करिना दुस-यांदा प्रेग्नंट आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत बाळाला जन्म देणार आहे. सैफिनाचे हे दुसरे बाळ कोरोनियल असणार आहे. ‘कोरोनियल ’ म्हणजे काय? सैफिनाचे दुसरे बाळ ‘कोरोनियल ’ कसे होणार? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्ही सांगू इच्छितो की, ‘कोरोनियल’ ही कुठल्याही आजार वा मेडिकल कंडिशनशी संबंधित संकल्पना नाही. ही एक टर्म आहे. कोरोना व्हायरसच्या काळात जन्म घेणा-या मुलांसाठी ही टर्म वापरली जाते.

अर्बन डिक्शनरी डॉट कॉमनुसार,  2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीकाळात जन्मदरात वाढ झाली आहे आणि या कोरोना महामारीच्या काळात जन्मलेल्या जनरेशनला ‘कोरोनियल’ म्हटले जात आहे.  या जनरेशनची बहुतांश मुलं डिसेंबर 2020नंतर आणि सप्टेंबर 2021 पूर्वी जन्मतील. एकंदर काय तर कोरोना काळात जन्मलेली मुलं असा टर्मचा सरळसाधा अर्थ आहे.
करिना कपूर व सैफ अली खान यांच्याशिवाय विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे अपत्यही ‘कोरोनियल बेबी’ असणार आहे. विराटने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का जानेवारी 2021 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्री अमृता राव हिचे बेबीही ‘कोरोनियल बेबी’ असणार आहे.

16 ऑक्टोबर 2012 रोजी बेबो व सैफू लग्नबंधनात अडकले होते. 2016 मध्ये बेबो आई झाली. लवकरच बेबो दुस-यांदा आई होणार आहे. करिना कपूर ही सैफची दुसरी पत्नी आहे. सैफ अली खानपेक्षा करिना 10 वर्षे लहान आहे. शाहीद कपूरसोबत ब्रेकअप झालल्यावर करिनाची सैफसोबत 2008 मध्ये ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. यादरम्यानच दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. नंतर हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण बेबोने लग्नासाठी सहज होकार दिला नाही. एकदा नाही तर दोनदा तिने सैफचे लग्नाचे प्रपोजल नाकारले होते. सैफने करिना पॅरिसमध्ये दोनदा प्रपोज केले होते. पण  मी तुला अजून पूर्णपणे ओळखत नाही, असे म्हणून बेबोने लग्नासाठी नकार दिला होता. अर्थात हा पूर्णपणे  नकार नव्हता.  मला तुला आणखी जाणून घ्यायचे आहे, असा तिचा अर्थ होता. यानंतर ब-याच वर्षांनी करिनाने सैफसोबत लग्नाला होकार दिला होता आणि आज ती तिचा निर्णय योग्य असल्याचे मानते.

या दोन गोष्टीशिवाय राहूच शकत नाहीत सैफू व बेबो; हेच आहे सुखी जीवनाचे रहस्य!!

त्याच्यासारखा तोच, दुसरा सैफ होऊच शकत नाही...;  करिना कपूर असे का म्हणाली?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor and Saif Ali Khan to have a 'coronial' baby. Here is what it means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app