There’ll never be another Saif, says Kareena kapoor | त्याच्यासारखा तोच, दुसरा सैफ होऊच शकत नाही...;  करिना कपूर असे का म्हणाली?

त्याच्यासारखा तोच, दुसरा सैफ होऊच शकत नाही...;  करिना कपूर असे का म्हणाली?

ठळक मुद्देवर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग मुंबईत सुरु करणार आ

करिना कपूर खान व सैफ अली खान यांनी नुकताच लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या 8 वर्षानंतरही करिना-सैफची रिअल लाईफ केमिस्ट्री कायम आहे. आजही सैफिना समोर येतात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. सैफसोबत लग्न करण्याचा करिनाचा निर्णय खरे तर सर्वांसाठीच धक्कादायक होता. पण बेबो तिच्या निर्णयावर ठाम होती. अगदी या निर्णयासाठी आई-वडिलांच्या विरोधात जायलाही तयार होती. लग्नास परवानगी देत नसाल तर मी सैफसोबत पळून जाईल, अशी धमकीच करिनाने आई-वडिलांना दिली होती. एकंदर काय तर सैफच्या प्रेमात बेबो अक्षरश: वेडी झाली होती. का? तर याचे उत्तर इतक्या वर्षानंतर तिने दिले आहे. सैफसारखा दुसरा कोणीच असू शकत नाही, असे तिने म्हटले आहे. 

डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत बेबो सैफूबद्दल बोलली. ‘सैफ हा एक हुशार, चाणाक्ष अभिनेता आहे. शेकडो सुपरस्टार्स होऊ शकतील पण सैफसारखा दुसरा सैफ शक्यच नाही. त्याच्यासारखा दुसरा कोणीच होऊ शकत नाही. तो अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या आवडीनिवडीही जगावेगळ्या आहेत,’ असे बेबो म्हणाली. 
 ‘व्यावसायिक चित्रपटांत 25 वर्षे काम केल्यानंतर सैफने ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने नवा ट्रेंड सुरु करून भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून दिला,’ असेही ती म्हणाली.

निर्मिती व्यवसायात उतरशील का?
बॉलिवूडचे अनेक स्टार्स निर्मिती क्षेत्रात उतरले. तुझा असा काही इरादा आहे का? या प्रश्नावर करिनाने नकारार्थी उत्तर दिले. माझे स्वत:चे प्रॉडक्शन आहे, ते म्हणजे तैमूर. मला फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. लवकरच करिना दुस-यांदा आई होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनंतर ती आपल्या दुस-या मुलाच्या संगोपनात बिझी होणार आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग मुंबईत सुरु करणार आहे. लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 1994साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

'या' अटीवर सैफ अली खानसोबत लग्नाला तयार झाली होती बेबो

या दोन गोष्टीशिवाय राहूच शकत नाहीत सैफू व बेबो; हेच आहे सुखी जीवनाचे रहस्य!!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: There’ll never be another Saif, says Kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.