ठळक मुद्देसैफने करिना पॅरिसमध्ये दोनदा प्रपोज केले होते. पण  मी तुला अजून पूर्णपणे ओळखत नाही, असे म्हणून बेबोने लग्नासाठी नकार दिला होता.

करिना कपूर खान व सैफ अली खान बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी आहे. दोघांच्या लग्नाचा आज 8 वा वाढदिवस. 16 ऑक्टोबर 2012 रोजी बेबो व सैफू लग्नबंधनात अडकले होते. 2016 मध्ये बेबो आई झाली. लवकरच बेबो दुस-यांदा आई होणार आहे. आज लग्नाच्या वाढदिवशी बेबोने सैफूला खास शुभेच्छा दिल्यात. केवळ इतकेच नाही सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने तिच्या आनंदी दांम्पत्यजीवनाचे रहस्यही सांगितले.

सैफसोबतचा एक फोटो शेअर करत बेबोने लिहिले, बेबो नावाची एक मुलगी आणि सैफू नावाचा एक मुलगा होता. दोघांना स्पॅगेटी आणि वाईन खूप आवडायची आणि दोघेही आनंदात राहू लागलेत. यावरून या आनंदी दांम्पत्यजीवनाचे रहस्य तुम्हाला कळले असेलच...! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आनंदी राहा.

करिना कपूर ही सैफची दुसरी पत्नी आहे. सैफ अली खानपेक्षा करिना 10 वर्षे लहान आहे. शाहीद कपूरसोबत ब्रेकअप झालल्यावर करिनाची सैफसोबत 2008 मध्ये ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. यादरम्यानच दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. नंतर हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण बेबोने लग्नासाठी सहज होकार दिला नाही. एकदा नाही तर दोनदा तिने सैफचे लग्नाचे प्रपोजल नाकारले होते.

सैफने करिना पॅरिसमध्ये दोनदा प्रपोज केले होते. पण  मी तुला अजून पूर्णपणे ओळखत नाही, असे म्हणून बेबोने लग्नासाठी नकार दिला होता. अर्थात हा पूर्णपणे  नकार नव्हता.  मला तुला आणखी जाणून घ्यायचे आहे, असा तिचा अर्थ होता. यानंतर ब-याच वर्षांनी करिनाने सैफसोबत लग्नाला होकार दिला होता आणि आज ती तिचा निर्णय योग्य असल्याचे मानते.
 करिना आणि सैफ सध्या एक आनंदी जीवन जगत आहेत. काही दिवसांपूर्वीच करिनाने ती पुन्हा आई होणार असल्याची बातमी फॅन्सना दिली होती. त्यावरूनही ती सध्या चर्चेत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor and saif ali khan reveals secret on 8th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.