SEE PICS : सात महिन्यांची गर्भवती अनुष्का शर्मा कामावर परतली, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 17:12 IST2020-11-22T17:10:16+5:302020-11-22T17:12:20+5:30
अनुष्का लवकरच आई होणार आहे. मात्र आधी केलेल्या कमिटमेंट पूर्ण करण्याचे वचन तिने पूर्ण केले आहे.

SEE PICS : सात महिन्यांची गर्भवती अनुष्का शर्मा कामावर परतली, फोटो व्हायरल
अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा पुन्हा कामावर परतली आहे. अनुष्का लवकरच आई होणार आहे. मात्र आधी केलेल्या कमिटमेंट पूर्ण करण्याचे वचन तिने पूर्ण केले आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या अनुष्काने नुकतेच एका प्रोजेक्टसाठी शूटींग केले. या शूटींगच्या सेटवरचे अनुष्काचे फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोत अनुुष्का मोरपंखी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि तोंडावर मास्क आहे. स्वत:ला जपत, अतिशय काळजीपूर्वक ती व्हॅनिटी व्हॅनमधून उतरते आहे. रिपोर्टनुसार, अनुष्का पुढील 7 दिवस शूटींग करणार आहे.
अनुष्काने सेटवरचे काही फोटोही शेअर केले आहेत. यात सेटवरची संपूर्ण युनिट पीपीई किटमध्ये आहे. जणू काही सेटवर ड्रेसकोड आहे असे वाटतेय, या कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत.
आयपीएल 2020 दरम्यान दुबईमध्ये पती विराट कोहलीसोबत बराच वेळ घालवल्यानंतर अनुष्का शर्मा मुंबईत परतली आहे. येथे ती तिच्या पालकांह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आईबाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत अनुष्का आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय. पोलका डॉच फ्रिल ड्रेसपासून ते डंगरीपर्यंत अनुष्काच्या वॉर्डरोब एकापेक्षा एक सुंदर फॅशनेबल मॅटर्निटी ड्रेस पाहायला मिळत आहेत.
विराटची रजा
विराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत आणि अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटने रजा मागितली. बीसीसीआने कर्णधाराच्या या निर्णयाचा आदर करताना ही सुट्टी मान्य केली. पण, विराटच्या या निर्णयावर नेटिझन्समध्ये जुंपली आहे.
विराटने ‘राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या’ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली. 2015च्या वर्ल्ड कप साठी धोनी दौ-यावर होता आणि त्याचवेळी मायदेशात असलेल्या पत्नी साक्षीची प्रसुती झाली आणि झिवाचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर लगेच भारतात परतण्याऐवजी धोनीने संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच मायदेशात परतला होता, याचे नेटकºयांनी विराटला स्मरण करून दिले.