'फुले' सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार; महात्मा-सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:30 IST2025-01-03T13:30:20+5:302025-01-03T13:30:42+5:30

सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

pratik gandhi and patralekha phule movie based on mahatma and savitri bai phule release date details | 'फुले' सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार; महात्मा-सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

'फुले' सिनेमा 'या' दिवशी प्रदर्शित होणार; महात्मा-सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गेल्यावर्षी त्यांच्यावर आधारित हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. स्त्रियांना समाजात आणि शिक्षणात समान वागणूक मिळावी म्हणून आयुष्यभर झटणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकचं नाव 'फुले'असं आहे. या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात महात्मा फुले यांच्या जयंतीला 'फुले' या हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात प्रतिक गांधी महात्मा फुले तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून 'फुले' हा सिनेमा येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. 


झी स्टुडियोची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरू आहे. अखेर यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. प्रतीक गांधी-पत्रलेखा यांना ज्योती-सावित्रीच्या भूमिकेत पाहायला चाहते उत्सुक आहेत. 
 

Web Title: pratik gandhi and patralekha phule movie based on mahatma and savitri bai phule release date details