'धुरंधर २'वर प्रकाश राज यांची पोस्ट, रणवीर आणि अदित्य धरच्या चित्रपटाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:37 IST2026-03-22T13:37:03+5:302026-03-22T13:37:50+5:30
ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी 'धुरंधर २'वर पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'धुरंधर २'वर प्रकाश राज यांची पोस्ट, रणवीर आणि अदित्य धरच्या चित्रपटाबाबत म्हणाले...
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई केली असून, दोन दिवसांत या चित्रपटानं जगभरात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत असताना, दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी 'धुरंधर २'वर पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रकाश राज यांनी आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते जुन्या सदाबहार गाण्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ते सध्या 'धुरंधर'पासून "कोसो दूर" आहेत. इतकेच नाही तर त्यांनी प्रेक्षकांना विचारले आहे की, "तुम्ही सध्या काय करत आहात?" त्यांच्या या पोस्टमुळे ते या 'स्पाय थ्रिलर' चित्रपटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत असल्याची चर्चा रंगली आहे.
Me .. Bahut Door from #Dhurandhar ….are you #justaskingpic.twitter.com/UniBXj8mCN
— Prakash Raj (@prakashraaj) March 19, 2026
दरम्यान, 'धुरंधर २' चित्रपट देशभक्तीच्या नावाखाली 'प्रोपागंडा' आणि अति-राष्ट्रवाद पसरवत असल्याचा आरोप अभिनेत्री रम्या स्पंदना हिने केला आहे. अभिनेत्री रम्याने हा चित्रपट न पाहण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांचा मात्र चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.