प्रकाश झा - पीसी यांचा ‘फेसआॅफ’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 22:07 IST2016-02-20T05:07:59+5:302016-02-19T22:07:59+5:30
प्रियंका चोप्राने जेव्हा ‘जय गंगाजल’ ची शूटिंग सुरू केली तेव्हापासून ती दिग्दर्शक प्रकाश झा यांना सेटवर किती घाबरते याच्या ...

प्रकाश झा - पीसी यांचा ‘फेसआॅफ’ !
प रियंका चोप्राने जेव्हा ‘जय गंगाजल’ ची शूटिंग सुरू केली तेव्हापासून ती दिग्दर्शक प्रकाश झा यांना सेटवर किती घाबरते याच्या बातम्या आणि चर्चा सुरू होत्या. मात्र, चित्रपटाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की, दिग्दर्शक प्रकाश झा हे अभिनयाच्या क्षेत्रात या चित्रपटापासून त्यांचा डेब्यू करत आहेत. त्यामुळे दिग्दर्शक - अभिनेत्री हे प्रथमच एकत्र एकमेकांसमोर दिसणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना झा म्हणाले,‘ प्रियंका सारख्या उत्तम अभिनेत्रीला चित्रपटात कास्ट करणे ही अत्यंत सोपी बाब आहे पण तिला एक अभिनेत्री म्हणून सामोरे जाणे अत्यंत कठीण बाब आहे.’ सेटवरील गमतीजमती सांगतांना प्रकाश झा म्हणाले,‘ पीसी मला म्हणते, तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक आहात तेव्हा तुम्ही जे सांगाल तशीच मी अॅक्टिंग करेल पण जेव्हा तुम्ही एक अभिनेता म्हणून माझ्यासमोर याल तेव्हा ‘मैं देख लुंगी’ असे ती म्हणते. वेल, अभिनयातील डेब्यू आणि तो ही प्रियंकासोबत. गे्रट झा.
![priyanka]()