प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 13:11 IST2021-04-07T13:11:22+5:302021-04-07T13:11:53+5:30
अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली.

प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट
अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली. वयाच्या १७व्या वर्षात तिने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. रॉक ऑन चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी प्राची २० वर्षांची होती. तिच्या करिअरमध्ये बरेच चढउतार आले. एका कालावधीनंतर ती सिनेइंडस्ट्रीतून गायब राहिली होती. कठोर परिश्रमानंतर झगमगत्या इंडस्ट्रीत आपली ओळख बनवणारी प्राची देसाईला आजही तिचे चाहते पसंत करतात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तिचे कौतूक करतात.
नुकत्याच एका मुलाखतीत प्राची देसाई खासगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल सांगितले. लग्नाच्या प्रश्नावर ती म्हणाली की, माझ्या कुटुंबाने माझे जसे पालनपोषण केले आहे त्यानुसार मी लग्नासाठी सुरक्षित आणि आरामदायी मानत नाही. मी जेव्हा माझ्या करिअरच्या वाईट काळात असेन तेव्हा लग्न करेन. माझे इथेपर्यंत पोहचणे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.
प्राची पुढे म्हणाली की, माझे मित्र जेव्हा लग्नाबद्दल बोलत असतात की त्यांच्या घरी लग्नाबद्दल बोलायला सुरूवात झाली आहे तर मी पाहून हैराण होते. माझ्या कुटुंबातील लोक कधीच याबद्दल बोलत नाही. मी सिनेमात किती तरी वेळा लग्न केले आहे. तसे तर ऑनस्क्रीन मी किती तरी वेळा लग्न केले आहे. माझा जो जोडीदार असेल त्याला खूप तयार रहावे लागेल. मी माझ्या सिद्धांतावर जीवन जगते आणि लग्नासाठी मी माझे स्वातंत्र्य गमावू शकत नाही.
लग्नाबद्दल प्राची देसाई म्हणाली की, मी काही वर्षांनंतर लग्न करू शकते पण परफेक्ट मुलगा माझ्या जीवनात येईल तेव्हा. माझ्या घरातल्यांनी कधीच लग्नाला घेऊन माझ्यावर जबरदस्ती केली नाही. ते माझा सन्मान करतात. मी बॉलिवूडमध्ये स्वतःच्या कौशल्यावर स्थान मिळवले आहे. माझा कोणीच गॉडफादर नाही.
प्राची नुकतीच मनोज वाजपेयीसोबत सायलेंस या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाली.