अखेर प्रभासने वडिलांची ती इच्छा पूर्ण केली, कोट्यवधीची अलिशान गाडी दारात उभी केली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:14 IST2021-03-29T16:13:46+5:302021-03-29T16:14:34+5:30

होय, गाड्यांची प्रचंड आवड असलेल्या प्रभासच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एक कार सामील झाली आहे.

prabhas buy a new lamborghini aventador car | अखेर प्रभासने वडिलांची ती इच्छा पूर्ण केली, कोट्यवधीची अलिशान गाडी दारात उभी केली!!

अखेर प्रभासने वडिलांची ती इच्छा पूर्ण केली, कोट्यवधीची अलिशान गाडी दारात उभी केली!!

ठळक मुद्देप्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आदिपुरुष या चित्रपटातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘बाहुबली’ फेम प्रभासच्या डोक्यावर 1000 कोटींचे कर्ज, अशी बातमी अगदी काही महिन्यांपूर्वी आली होती. पण आता त्याच प्रभासची नवी कोरी अलिशान गाडी पाहाल तर थक्क व्हाल. होय, गाड्यांची प्रचंड आवड असलेल्या प्रभासच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एक कार सामील झाली आहे. प्रभासकडे कोट्यवधी रूपयांच्या अनेक गाड्या आहेत. पण आता त्याने तब्बल सहा कोटींची अलिशान कार खरेदी केली आहे.
होय, प्रभासने अलिकडेच लॅम्बॉर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही गाडी खरेदी केली. शिवाय आपल्या दिवंगत पित्याचे स्वप्नही पूर्ण केले आहे.

2010 साली प्रभासच्या वडिलांचे निधन झाले. एकदा तरी लॅम्बॉर्गिनीत फिरावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण ही कोट्यवधीची कार खरेदी करण्याइतकी परिस्थिती नव्हती. त्यामुळे प्रभासच्या वडिलांचे लॅम्बॉर्गिनीत फिरण्याचे स्वप्न स्वप्नचं राहिले, मात्र आता प्रभासने वडिलांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे.

आज 10 वर्षानंतर प्रभास सुपरस्टार बनला आहे. जगाच्या पाठीवर त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. आज तो सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक आहे. लॅम्बॉर्गिनी खरेदी करणे त्याच्यासाठी आज फार कठीण नाही. त्यामुळेच वडिलांच्या स्मरणार्थ प्रभासने ही गाडी खरेदी केली.  प्रभासने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत भारतात 6 कोटी रूपये आहे. प्रभासच्या फॅन पेजवर या गाडीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. शिवाय ही गाडी चालवत असतानाचे प्रभासचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आदिपुरुष या चित्रपटातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात तो भगवान श्री राम यांची भूमिका साकारणार आहे.

Web Title: prabhas buy a new lamborghini aventador car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास