प्रभास आणि पूजा हेगडेच्या 'राधेश्याम'चा First look आऊट, ट्विरवर होतोय ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 15:10 IST2020-07-10T15:05:41+5:302020-07-10T15:10:44+5:30
अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम'मध्ये प्रभाससोबत रोमांस करताना दिसणार आहे

प्रभास आणि पूजा हेगडेच्या 'राधेश्याम'चा First look आऊट, ट्विरवर होतोय ट्रेंड
‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभासचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रभासच्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम'मध्ये प्रभाससोबत रोमांस करताना दिसणार आहे. यूवी क्रिएशन्सच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे हिंदी वर्जन टी-सिरीज घेऊन येते आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाल्यानंतर ट्विटरवर तो नंबर वनला ट्रेंड होतो आहे. बिग बजेट असलेला हा सिनेमा 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास यांनी चित्रपटाचे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रशासनेदेखील सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्राभसने पोस्टर शेअर करताना लिहिले, ''आशा आहे की माझ्या फॅन्सना हे आवडले.'' यापूर्वी प्रभास सोहा सिनेमात श्रद्धा कपूरसोबत दिसला होता.
युवी क्रिएशंसचे प्रमोद याविषयी सांगतात की, "हा आमच्या सगळ्यांसाठीच एक रोमांचक क्षण आहे कि आम्ही आमच्या आगामी प्रोजेक्ट 'राधेश्याम'मधील प्रभास आणि पूजा हेगडे यांचे बहुप्रतीक्षित पोस्टर प्रदर्शित केले आहे. प्रभाससोबत काम करणे नेहमीच मजेदार आणि समृद्ध करणारे राहिले आहे.”
प्रभास आणि पूजा हेगडेसह यात भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन अशा मोठ्या कलाकारांची फळी दिसणार आहे.