‘बाहुबली’ नव्हे तर ‘या’ चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टीमध्ये फुलले प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 21:09 IST2018-05-18T15:39:05+5:302018-05-18T21:09:05+5:30

‘बाहुबली’ फेम प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने पुन्हा एकदा निर्माता करण जोहरची आॅफर्स नाकारल्यामुळे तो चर्चेत आला ...

Prabhas and Anushka Shetty are full of love during the film, not 'Bahubali'. | ‘बाहुबली’ नव्हे तर ‘या’ चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टीमध्ये फुलले प्रेम!

‘बाहुबली’ नव्हे तर ‘या’ चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टीमध्ये फुलले प्रेम!

ाहुबली’ फेम प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने पुन्हा एकदा निर्माता करण जोहरची आॅफर्स नाकारल्यामुळे तो चर्चेत आला आहे. वृत्तानुसार, प्रभासकडे डेट्स कमी असल्याने त्याने करणचा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, प्रभास त्याच्या चित्रपटांबरोबरच लव्ह लाइफमुळेही चांगलाच चर्चेत असतो. ‘बाहुबली-२’मध्ये त्याच्या अभिनेत्रीची भूमिका साकारणाºया अनुष्का शेट्टीचे नाव त्याच्याशी नेहमीच जोडले जात आहे. पडद्यावर ज्या पद्धतीने दोघांची केमिस्ट्री रंगली होती, त्यावरून या दोघांनी रियल लाइफमध्येही एकत्र यावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. वास्तविक या चित्रपटानंतरच दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. अजूनही ही चर्चा कायम आहे. वृत्तानुसार, प्रभास आणि अनुष्का एकमेकांना बघितल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. शूटिंगदरम्यान, हे दोघे एकमेकांशी तासन्तास व्हिडीओ चॅट करीत असल्याचे समजते. 



तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अनुष्काच्या परिवारातून कोणीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाही. अनुष्का मंगळुरू येथे एक योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत असे. तिची सुंदरता बघून एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटाची आॅफर दिली होती. अनुष्काने २००५ मध्ये आपल्या पहिल्या ‘सुपर’ या चित्रपटात काम केले होते. पुढे २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि प्रभासने एकत्र काम केले होते. प्रभासने अनुष्काला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. 



काही काळ अनुष्का आणि प्रभासमध्ये अफेअर चालल्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. मात्र ‘बाहुबली’च्या सेटवर पुन्हा एकदा त्यांच्यात जवळिकता निर्माण झाली. प्रभासचे काका कृष्णम राजू यांनी सांगितले होते की, या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रभास लग्नाच्या बंधनात अडकू शकतो. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, अनुष्का प्रभासला भेटण्यासाठी ‘साहो’च्या सेटवर गेली होती. यावेळी तिने प्रभासला स्टंट न करण्याचा सल्ला दिला होता. तसेच स्टंट करण्यासाठी स्टंटमॅनचा वापर करण्यासही सांगितले होते. 

Web Title: Prabhas and Anushka Shetty are full of love during the film, not 'Bahubali'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.