‘क्वांटिको2’च्या पोस्टरमध्ये दडलेयं एक रहस्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:59 IST2016-08-11T12:29:55+5:302016-08-11T17:59:55+5:30
‘क्वांटिको’ या शोने प्रियांका चोप्रा हिला हॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख दिली आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर ...
.jpg)
‘क्वांटिको2’च्या पोस्टरमध्ये दडलेयं एक रहस्य!
‘ ्वांटिको’ या शोने प्रियांका चोप्रा हिला हॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख दिली आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच या शोचे दुसरे सीझनही येणार आहे. याच दुसºया सीझनच्या शूटींगमध्ये पीसी सध्या बिझी आहे. आज पीसीने ‘क्वांटिको2’चे पोस्टर शेअर केले. या पोस्टरने प्रियांकासंदर्भातील एक रहस्य उजागर केले आहे. हे रहस्य म्हणजे ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनमध्ये प्रियांका एका एफबीआय एजंटच्या भूमिकेत दिसली होती, हे तुम्हाला ठाऊक असेलच. मात्र दुसºया सीझनमध्ये प्रियांका सीआयए एजंट म्हणून दिसणार आहे. या पोस्टरमध्ये प्रियांकाच्या हाती एक ओळखपत्र दिसते. ‘क्वांटिको2’मध्ये केवळ हाच नाही तर आणखीही काही बदल पाहायला मिळणार आहे. ‘क्वांटिको2’चे पोस्टर शेअर करताना पीसीने त्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा पीसी ‘क्वांटिको2’मध्ये सीआयए एजंटच्या भूमिकेत कशी दिसते, ते बघूच!!
![]()