पोर्न स्टार मिया खलिफाने म्हटले, ‘भारतात कधीच पाऊल ठेवणार नाही’, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 16:46 IST2017-11-01T11:03:27+5:302017-11-01T16:46:01+5:30

पोर्न स्टार मिया खलिफा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे, परंतु तिने ही चर्चा चुकीचे असल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर!

Porn star Mia Khalifa said, 'I will never step in India', read detailed! | पोर्न स्टार मिया खलिफाने म्हटले, ‘भारतात कधीच पाऊल ठेवणार नाही’, वाचा सविस्तर!

पोर्न स्टार मिया खलिफाने म्हटले, ‘भारतात कधीच पाऊल ठेवणार नाही’, वाचा सविस्तर!

सध्या एकेकाळची पोर्न स्टार मिया खलिफा प्रचंड चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, मिया खलिफा एका Chunkzz 2: The Conclusion या मल्याळम् चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. मात्र मियानेच या वृत्तास अफवा असल्याचे म्हटले आहे. मियाच्या मते, ‘मला याविषयी काहीच माहिती नसून, ही बातमी पूर्णत: चुकीची आहे. मियाने एकदा असे म्हटले होते की, ‘मी भारतात कधीच पाऊल ठेवणार नाही.’ त्यामुळे मिया तिच्या या वक्तव्यावरून घूमजाव करणार असे सध्या तरी दिसत नाही. कोण आहे ही मिया खलीफा यावर प्रकाशझोत टाकणारा हा वृत्तांत...

मियाचे खरे नाव मिया कलिस्टा आहे. २४ वर्षीय मियाचा जन्म १९९३ मध्ये लेबनानच्या बेरूतमध्ये झाला. जेव्हा मिया सात वर्षांची होती तेव्हा तिचा परिवार अमेरिकेतील मेरीलॅण्डमध्ये स्थायिक झाला. मियाला ब्यूटी विद ब्रेन असे म्हटले जाते. तिने इतिहास या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. पोर्न स्टार बनण्याअगोदर मिया खलिफा मायामी फ्लोरिडा येथे एका रेस्टॉरंटमध्ये काम करीत होती. तेथूनच तिला एका व्यक्तीने पोर्न इंडस्ट्रीत येण्याची आॅफर दिली होती. मियानेदेखील ही आॅफर त्यावेळी लगेचच स्वीकारली होती. मात्र मियाचा हा निर्णय तिच्या आई-वडिलांना अजिबातच आवडला नव्हता, त्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले. मियाने केवळ तीनच महिने पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम केले. परंतु एवढ्या कमी काळातच ती जगातील क्रमांक एकची पोर्नस्टार बनली.

२८ डिसेंबर २०१४ रोजी पोर्न हब या एडल्ट एंटरटेनमेंट वेबसाइडने मियाला जगातील क्रमांक एकची पोर्न स्टार असल्याची रॅकिंग दिली. मियाने जेव्हा पोर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते तेव्हा तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती विवाहित होती. वयाच्या १८ व्या वर्षीच तिने एका अमेरिकी व्यक्तीबरोबर विवाह केला होता. खरं तर मिया आणि वाद यांचे अतुट नाते आहे. कारण एका व्हिडीओमध्ये मिया बुरखा घालून सेक्स करताना बघावयास मिळते. मियाच्या या व्हिडीओमुळे त्याकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. 

मियाच्या या प्रतापामुळे तिला जिवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. मियाचा हा व्हिडीओ जवळपास १५ लाख वेळा बघण्यात आला आहे. मिया खलिफाच्या ट्विटरवर १० लाख आणि इन्स्टाग्रामवर तीन लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मिया सुरुवातीला मुस्लीम होती, मात्र आता ती ख्रिश्चन धर्माचे आचरण करते. मियाचा विरोध करण्यासाठी ‘मिया खलिफा’ नावाने एक गाणे तयार करण्यात आले आहे. हे गाणे अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मियाची एकूण संपत्ती चार कोटी रुपयांच्या आसपास आहे. मियाने आता पोर्न इंडस्ट्री सोडली असून, तिच्या पतीसोबत ती राहात आहे. 

Web Title: Porn star Mia Khalifa said, 'I will never step in India', read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.