पूनम पांडेनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 18:03 IST2017-05-20T12:33:01+5:302017-05-20T18:03:01+5:30

सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून वादंग निर्माण करणाºया पूनम पांडे हिने काल मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे ...

Poonam Pandey's vision of Siddhi Vinayak | पूनम पांडेनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!!

पूनम पांडेनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!!

शल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून वादंग निर्माण करणाºया पूनम पांडे हिने काल मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. नेहमीच बोल्ड कपड्यांमध्ये दिसणारी पूनम याठिकाणी सामान्य रूपात बघावयास मिळाली. यावेळी पूनमने व्हाइट सूट परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच पूनमला तिच्या फॅन्सनी घेराव घातला होता. तसेच तिच्यासोबत फोटोही काढले. 

यावेळी पूनम पांडेदेखील चांगल्या मुडमध्ये असल्याचे दिसून आले. तिने फॅन्सला विरोध न करता त्यांच्याबरोबर बिनधास्तपणे फोटो काढले. तसेच काहींसोबत सेल्फीही काढल्या. काही दिवसांपूर्वीच पूनमने तिचा अ‍ॅप लॉन्च केला होता, ज्यामुळे ती चर्चेत होती. मात्र काही दिवसांमध्ये गुगलने पूनमच्या या अ‍ॅपवर बॅन लावले. मात्र पुन्हा गुगलने पूनमच्या या अ‍ॅपवरील बॅन हटविले. 



गेल्यावेळेस पूनम पांडे तेव्हा चर्चेत आली जेव्हा बाथ टबमध्ये तिने हॉट फोटोशूट केले होते. त्यानंतर पूनमचे हे फोटो सोशल साइटवर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच या फोटोशूटमधून तिने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला होता. कारण तिचे हे फोटो आतापर्यंतचे सर्वांत बोल्ड फोटो आहेत. या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट हॉट ड्रेसमध्ये बघावयास मिळाली होती. 



पूनम अखेरीस गोविंदाच्या ‘आ गया हिरो’ या चित्रपटात गेस्ट रोलमध्ये बघावयास मिळाली होती. या चित्रपटात तिची भूमिका भलेही छोटी असली तरी महत्त्वपूर्ण होती. या अगोदर पूनमने २०११ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्व कप दरम्यान टीम इंडिया जिंकल्यास सर्व कपडे काढणार असल्याचे विवादास्पद वक्तव्य केले होते. त्यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. 

Web Title: Poonam Pandey's vision of Siddhi Vinayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.