पूनम पांडेने पुन्हा उतरवले कपडे! दिला महत्त्वपूर्ण संदेश!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 16:43 IST2016-10-19T16:43:42+5:302016-10-19T16:43:42+5:30
चित्रपट असो वा क्रिकेटच्या मैदानावर भारताचा विजय, अशा अनेक प्रसंगी यापूर्वी अनेकदा पूनम ‘स्ट्रिप’ करताना दिसली. सध्या तिचा एक नवा ‘स्ट्रिप व्हिडिओ’ व्हायरल झालाय.

पूनम पांडेने पुन्हा उतरवले कपडे! दिला महत्त्वपूर्ण संदेश!!
प नम पांडे म्हणजे सेक्सी अन् बोल्ड गर्ल! अलीकडे पूनम ‘वीकेंड’ या मोबाईल अॅडल्ट फिल्ममुळे चर्चेत होती. चित्रपट असो वा क्रिकेटच्या मैदानावर भारताचा विजय, अशा अनेक प्रसंगी यापूर्वी अनेकदा पूनम ‘स्ट्रिप’ करताना दिसली. सध्या तिचा एक नवा ‘स्ट्रिप व्हिडिओ’ व्हायरल झालाय. पण यावेळी पूनमने एक चांगला संदेश देण्यासाठी ‘स्ट्रिप’ केले आहे. पूनमने स्वत: सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला. टीव्हीवर क्रिकेट मॅच सुरु आहे आणि भारतीय क्रिकेटपटू तुफान खेळी खेळताहेत... ही मॅच पाहता पाहता पूनम स्ट्रिप करायला सुरुवात करते आणि सरतेशेवटी एक सामाजिक संदेश देते, असे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. पूनमचा हा व्हिडिओ ‘डिटेक्ट टू डिफिट’ नामक स्तनांच्या कर्करोगासाठीच्या जनजागृती मोहिमेचा भाग आहे. आपल्या चिरपरिचित सेक्सी अंदाजात पूनम यात स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करताना दिसतेय. स्तनांच्या कर्करोगाच्या प्रारंभिक तपासणीसाठी केवळ दोन मिनिटांचा कालावधी लागतो. यासाठी महिलांना न लाजता पुढे यायला हवे. कारण शरीर तिचे आहे आणि त्या शरीराची काळजी घेणे, तिचेच काम आहे, असा एक महत्त्वपूर्ण संदेश पूनमने या व्हिडिओद्वारे दिला आहे.
पूनमच्या आधी कृतिका कामरा, सरगुन मेहता, शाइना एन सी आणि सुनिधी चौहान यांच्यासह अनेकींना व्हिडिओद्वारे स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती अभियानात भाग घेतला होता.
‘कॉन्ट्रोवर्सियल गर्ल’ अशीच पूनमची ओळख आहे. पण यामुळे पूनमला काहीही फरक पडत नाही. लोक माझ्याबद्दल वाईट-वाईट बोलतात. पण मला त्याने काहीही फरक पडत नाही. कारण मी जे काही करतेय, त्यत काहीही वाईट नाहीय, असे पूनमचे ठाम मत आहे. आधीचे तर ठाऊक नाही. पण यावेळी मात्र पूनमने खरोखरीच चांगले काम केलेय. होय ना??